वाहिन्यांचे रेटिंग वाढवण्याच्या उद्देशाने काहींनी हंसा रिसर्च ग्रुपच्या माजी कर्मचाऱ्यांशी संगनमत करून घोटाळा केला, असा आरोप आहे. याप्रकरणी कांदिवली पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. एआरजी आऊटलायर कंपनीच्या रिपब्लिक टीव्हीचाही घोटाळ्यात सहभाग असल्याच्या संशयावरून मुंबई पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. मात्र, या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीच्या कर्मचाऱ्यांचा जाणीवपूर्वक छळ केला जात असल्याचा आरोप, अर्णब गोस्वामी यांनी विनंती अर्जात केला आहे. एआरजी आऊटलायर ग्रुप आणि स्वतःच्या नावाने आधीच्या प्रलंबित याचिकेत अर्ज दाखल केला आहे.
रिपब्लिक टीव्हीचे पश्चिम विभाग वितरण प्रमुख घनश्याम सिंग यांचा २६ दिवसांच्या कोठडीत प्रचंड मानसिक आणि शारीरिक छळ केला. सिंग यांना पट्ट्याने मारलं तसेच कंपनीच्या अन्य अधिकाऱ्यांना सातत्याने चौकशीसाठी बोलवून छळवणूक केली, असे गंभीर आरोप या अर्जात केले आहेत. तसंच, ‘ आमच्याविरोधात कुहेतूने ही चौकशी करत असल्याने ती स्थगिती करावी आणि तपास सीबीआयकडे सोपवावा’, असंही या अर्जात नमूद केलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times