वाचा:
राज्यात गेले काही दिवस करोना मृत्यूंचे प्रमाण कमी झाले आहे. आज राज्यात करोनाने ५३ रुग्ण दगावले असून आतापर्यंत या आजाराने एकूण ४७ हजार ८२७ जणांना प्राणास मुकावे लागले आहे. आज सर्वाधिक ७ मृत्यूंची नोंद पालिका हद्दीत तर ६ मृत्यूंची नोंद पालिका हद्दीत झाली आहे. राज्यातील आज २.५७ टक्के इतका असून तो आणखी खाली आणण्यासाठी आरोग्य यंत्रणांचे प्रयत्न सुरू आहेत.
वाचा:
राज्यात आजही नवीन करोना बाधितांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडा अधिक राहिला. गेल्या २४ तासांत ४ हजार २६ नवीन रुग्णांची भर पडली तर त्याचवेळी ६ हजार ३६५ रुग्ण करोनातून बरे होऊन आज घरी परतले. आतापर्यंत एकूण १७ लाख ३७ हजार ८० रुग्णांनी करोनावर मात करण्यात यश मिळवले असून राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) वाढून आता ९३.४२ टक्के इतके झाले आहे. करोना चाचण्यांचा आकडाही खूप मोठा आहे. आतापर्यंत एकूण १ कोटी १३ लाख ७७ हजार ७४ चाचण्या पूर्ण करण्यात आल्या असून त्यातील १८ लाख ५९ हजार ३६७ चाचण्यांचे (१६.३४ टक्के) अहवाल करोनासाठी पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ४८ हजार ९६१ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत तर ५ हजार ६१७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
वाचा:
राज्यात ७३ हजार अॅक्टिव्ह रुग्ण
राज्यातील उपचार घेत असलेल्या रुग्णांची ( अॅक्टिव्ह रुग्ण ) संख्या आज ७३ हजार ३७४ इतकी खाली आली आहे. त्यात पुन्हा एकदा पुणे जिल्ह्यातील आकडा सर्वात जास्त म्हणजे १५ हजार ३४४ इतका आहे. त्याखालोखाल जिल्ह्यात करोनाचे १४ हजार ३९ तर मुंबई पालिका हद्दीत करोनाचे १२ हजार २३१ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times