लोसान
ऑलिम्पिकसाठी चीनमधील वुहान येथे होणाऱ्या आशियाई टोकियो २०२० बॉक्सिंग पात्रता फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. येत्या ३ ते १४ फेब्रुवारीदरम्यान या पात्रता फेऱ्या होणार होत्या. चीनमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे या फेऱ्या रद्द करण्यात आल्याचे स्थानिक आयोजक समितीने कळवले आहे.

इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीची कृती समिती चायनीज ऑलिम्पिक कमिटी आणि अन्य सर्व भागीदारांसोबत या पात्रता फेऱ्यांसाठी अन्य पर्यायाची चाचपणी करत आहे. याबाबतची माहिती सर्व संबंधित राष्ट्रीय ऑलिम्पिक समित्या, राष्ट्रीय फेडरेशन्स आणि संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. तसेच याबाबतची पुढील घडामोड या संबंधित यंत्रणांना कळवण्यात येणार आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here