सरकार उद्या प्रस्ताव देईल. गृहमंत्र्यांनी लेखी प्रस्ताव देणार असल्याचं सांगितलं आहे. या प्रस्तावावर शेतकरी विचार करतील. सरकार कायद्यातील सुधारणेसाठी लेखी प्रस्ताव देईल, असं शेतकरी नेते हनान मुल्ला म्हणाले. म्हणजेच आजची बैठकही निरर्थक आहे. उद्या सरकारशी बैठक होणार नाही, असेही हनान मुल्ला यांनी बैठकीनंतर सांगितलं.
सरकार कृषी कायदे मागे घेण्यास तयार नाही. यामुळे शेतकरी नेते आणि सरकारमध्ये उद्या कुठलीही बैठक होणार नाही. कृषी कायद्यातील सुधारणेचा प्रस्ताव शेतकरी संघटनांना उद्या पाठवला जाईल. हा प्रस्ताव आल्यानंतर शेतकरी संघटनांची उद्या दुपारी १२ वाजता बैठक होईल. सिंघू सीमेवर ही बैठक घेण्यात येईल, अशी माहिती हनान मुल्ला यांनी दिली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि शेतकरी संघटनांच्या १३ नेत्यांमध्ये आज बैठक झाली. ही बैठक जवळपास २ तास चालली. रात्री वाजता सुरू झालेली ही बैठक रात्री ११ वाजता संपली. या बैठकीत कुठलाही तोडगा निघाला नाही. सरकारने कायदे रद्द करण्यास इन्कार केल्याने ही बैठकही निष्फळ ठरली. आता उद्या होणाऱ्या शेतकरी संघटनांच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सरकार शेतकरी नेत्यांना काय प्रस्ताव देते आणि या बैठकी काय निर्णय होतो, याकडे लक्ष लागलं आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times