पुणे : पुण्यातील ही अवसायनात काढण्याबाबतचा प्रस्ताव विभागाने ‘ ‘कडे पाठविला आहे. हा प्रस्ताव मान्य झाल्यास पाच लाख रुपयांपर्यंतच्या ठेवीदारांना ठेवी परत मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. ( Latest News )

वाचा:

आर्थिक अनियमितता आणि अन्य कारणांमुळे ‘आरबीआय’ने शिवाजीराव भोसले सहकारी बँकेवर निर्बंध लावले होते. या बँकेची ”ने २६ एप्रिल २०१९ रोजी विशेष तपासणी केली होती. त्यामध्ये कामकाजात अनियमितता आढळून आली होती. त्यानुसार ‘आरबीआय’ने या बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमण्याचे आदेश सात ऑक्टोबर २०१९ रोजी दिले होते. त्यानंतर खातेदारांवर बँकेतून पैसे काढण्यासाठी मर्यादा लावण्यात आली. या प्रकरणी बँकेचे संचालक आमदार यांच्यासह अकरा पदाधिकाऱ्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाचा:

या बँकेतील ठेवीदारांना दिलासा देण्यासाठी ही बँक अवसायनात काढण्याचा प्रस्ताव ‘आरबीआय’कडे पाठविण्यात आला आहे. ‘आरबीआय’ने हा प्रस्ताव मान्य केल्यास पाच लाख रुपयांपर्यंतच्या ठेवीदारांना ठेवी परत मिळतील. मात्र, त्यापेक्षा जास्त रकमेच्या ठेवी गुंतविणाऱ्या ठेवीदारांना पाच लाख रुपयांपर्यंतच परतफेड मिळू शकेल. पाच लाख रुपयांपेक्षा कमी रकमेच्या ठेवी असणारे सुमारे ७१ हजार, तर पाच लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कमेच्या ठेवी गुंतविणारे सुमारे आठ हजार सभासद असल्याची माहिती सहकार विभागाकडून देण्यात आली.

दरम्यान, या बँकेचे ९३ हजार १२८ खातेदार आणि ठेवीदार आहेत. त्यांच्याकडून सुमारे ४३२ कोटी ८६ लाख रुपयांच्या ठेवी ठेवण्यात आल्या आहेत. बँकेने सुमारे ३१० कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. तसेच सुमारे २९४ कोटी रुपयांचे अनुत्पादित कर्ज आहे. या बँकेच्या १४ शाखा आहेत.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here