मेघना राजने तिच्या कुटुंबियांच्या संपर्कात ज्या व्यक्ती आल्या त्यांनी सर्वांनीच करोनाची चाचणी करून घ्यावी अशी विनंती तिने केली. मेघनाने सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिले की, ‘माझे वडील, आई, मी आणि माझ्या मुलाला करोनाची लागण झाली आहे. आम्ही त्या सर्वांना ही माहिती देऊ इच्छितो जे गेल्या काही आठवड्यांत आमच्या संपर्कात आले आहेत. मी चिरू () आणि माझ्या चाहत्यांना विनंती करते की कोणीही घाबरून जाऊ नका.’
मेघनाने पुढे लिहिले की, ‘मी चाहत्यांना सांगू इच्छिते की आम्ही आता बरे आहोत आणि आमच्यावर उपचार सुरू आहेत. ज्यूनिअर सी देखील ठीक आहे आणि माझा प्रत्येक क्षण कसा व्यस्त जाईल याची तो काळजी घेत आहे. एक कुटुंब म्हणून आम्ही हे युद्ध लढत आहोत आणि जिंकूनच येऊ.’ मेघनाच्या या पोस्टवर तिच्या शुभचिंतकांनी कुटुंबिय या आजारातून लवकर बरं होण्याची प्रार्थना केली.
विशेष म्हणजे, हृदयरोगाच्या कारणामुळे चिरंजीवी सरजा यांचे यावर्षी 7 जून रोजी निधन झाले. बंगळुरूच्या एका खासगी रुग्णालयात वयाच्या 39 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. चिरंजीवी सर्जा यांचे निधन झाले तेव्हा त्यांची पत्नी मेघना राज तीन महिन्यांची गरोदर होती. काही काळापूर्वीच मेघनाने एका मुलाला जन्म दिला.
हृदयविकाराच्या झटक्याने अभिनेता चिरंजीवी याचं निधन झालं. वयाच्या ३९ व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. जेव्हा चिरंजीवीचं निधन झाल तेव्हा त्याची पत्नी मेघना तीन महिन्यांची गरोदर होती. काही दिवसांपूर्वीच मेघनाने मुलाला जन्म दिला.
चिरंजीवी सर्जा आणि मेघना राज यांनी २०१७ मध्ये साखरपुडा केला होता. त्याच्या पुढच्याच वर्षी ३० एप्रिल २०१८ मध्ये दोघांनी ख्रिश्चन पद्धतीने लग्न केलं होतं. तर दोन दिवसांननी २ मे २०१८ रोजी हिंदू पद्धतीने राजेशाही थाटात लग्न केलं होतं.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times