जालना: ‘ संपूर्ण महाराष्ट्रात पोहचविण्यासाठी कोल्डचेन, वैद्यकीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण यासह सर्व कामे पूर्ण झाली आहेत. आता केंद्र सरकार आणि भारताचे औषध महानियंत्रक यांच्या परवानगीची आम्ही वाट पाहतोय’, असे महत्त्वाचे विधान आज राज्याचे आरोग्यमंत्री यांनी केले. जालना येथे टोपे पत्रकारांशी बोलत होते. (Maharashtra Health Minister )

वाचा:

देशातील पाच औषध कंपन्या करोना प्रतिबंधात्मक लस तयार करण्याचे काम करत आहेत. यातील इन्स्टिट्युटमध्ये उत्पादित झालेल्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या लसीची भारतात साडेबारा हजार लोकांवर यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे तर संपूर्ण जगात साधारण पस्तीस हजार लोकांवर या लसीच्या चाचण्या घेण्यात आलेल्या आहेत. मी स्वतः सीरम इन्स्टिट्युटचे सीईओ यांच्याशी याबाबत सविस्तर चर्चा केली आहे, असेही टोपे यांनी यावेळी नमूद केले.

वाचा:

रक्तदानाबाबतही राजेश टोपे यांनी पुन्हा एकदा आवाहन केले आहे. रक्तदान करण्यात युवावर्ग नेहमी पुढे असतो. त्यांना रक्तदान करण्याचे आवाहन मी करत आहे. त्याचवेळी आपण सगळ्यांनीच रक्तदान केले पाहिजे. करोनाग्रस्त रुग्णांना रक्ताची मोठी आवश्यकता निर्माण होत आहे. त्यामुळेच रक्तदान ही निकड बनली आहे, असेही टोपे यांनी यावेळी सांगितले.

वाचा:

दरम्यान, लसीकरणासाठी प्रशासन स्तरावर सज्जता ठेवण्यात आली असताना २०२१ उजाडण्याआधी भारतात प्रत्यक्षात करोनावरील लसचा वापर सुरू करण्यास परवानगी मिळेल, असे स्पष्ट संकेत मिळू लागले आहेत. सीरम इन्स्टिट्युटने कोविशिल्ड लस उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वाची पावले टाकायला सुरुवात केली आहेत. करोनावरील लसीच्या ईमर्जन्सी वापरासाठी परवानगी देण्यात यावी म्हणून सीरमने भारताच्या औषध महानियंत्रकांकडे अर्ज केला आहे. अदर पूनावाला यांनी काल ट्वीटरच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली आहे. त्याचवेळी फायझरनेही त्यांची करोना प्रतिबंधक लस भारतात वापरण्यासाठी परवानगी मागितली आहे. शिवाय स्वदेशी कंपनी भारत बायोटेकनेही अशा परवानगीसाठी अर्ज केला आहे. ही सगळी पार्श्वभूमीवर लक्षात घेता राजेश टोपे यांचे विधान महत्त्वाचे असून राज्यात लवकरच करोनावरील लस उपलब्ध होईल अशी आशाही निर्माण झाली आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here