वाचा:
पिंपरी-चिंचवडमधून दररोज वाहन चोरी होते. तसेच घरफोडी, सोनसाखळी हिसकावणे यासासारख्या घटनांतही वाढ झाली आहे. निगडी-तळवडे रस्त्यावरील चिकन चौकातून ४ डिसेंबरला सकाळी फिरते शौचालय चोरीला गेले आहे. याप्रकरणी महेश नानासाहेब आढाव (वय ४२, रा. आनंदनगर, जुनी सांगवी) यांनी सोमवारी (७ डिसेंबर) ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
वाचा:
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोग्य विभागाकडून शहरात विविध ठिकाणी फिरते शौचालय ठेवण्यात आले आहेत. येथील चिकन चौकाजवळ देखील एक फिरते शौचालय ट्रॉली ठेवण्यात आली होती. ३ डिसेंबरला दुपारी सव्वातीन ते ४ डिसेंबर सकाळी सात या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी ९५ हजार रुपये किमतीची शौचालय ट्रॉली चोरून नेली आहे. निगडी पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times