वाचा:
शिर्डीतील येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी भारतीय पोषाखात यावे, अशी विनंतीवजा सूचना साईबाबा संस्थानाने भाविकांना केली आहे. यावरून मोठा वाद पेटला आहे. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी तर हा बोर्ड संस्थानने काढला नाही तर आम्ही तिथे येऊन काढू, असा थेट इशाराच दिला होता. मात्र त्यानंतरही हा बोर्ड हटवला गेला नसल्याने आम्ही १० डिसेंबर रोजी हा बोर्ड काढण्यासाठी येणार असल्याचे देसाई यांनी लेखी पत्रच साई संस्थानला पाठवले होते. त्यानंतर तातडीने साई संस्थान व भूमाता ब्रिगेडच्या वादात प्रशासनाने उडी घेत देसाई यांना शिर्डीत येण्यास बंदी घातली आहे.
वाचा:
तृप्ती देसाई या शिर्डी येथे आल्यास धार्मिक तेढ निर्माण होऊ शकते व त्यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचवेळी १४ नोव्हेंबरपासून भक्तांसाठी खुले झाल्याने साईबाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातून भाविकांची होणारी गर्दी पाहाता व तातडीची निकड पाहता संबंधित व्यक्तीस म्हणणे मांडण्यास पुरेसा अवधी देणे शक्य नाही. त्यामुळेच प्रतिबंधात्मक उपाय म्हणून फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (२) प्रमाणे प्राप्त अधिकारानुसार तृप्ती देसाई यांना ८ डिसेंबर रात्री बारा वाजल्यापासून ते ११ डिसेंबरच्या रात्री बारा वाजेपर्यंत शिर्डी नगरपंचायत हद्दीत प्रवेश करण्यास बंदी घालण्यात येत असल्याचे प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या आदेशाची प्रत महसूल व पोलीस प्रशासनातील कर्मचाऱ्यांनी देसाई यांना त्यांच्या घरी जाऊन दिली आहे. त्यामुळे आता देसाई काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times