पुणे: पुण्यात घुसला असून, त्याला बघण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी जमली आहे. वाट चुकलेला गवा महात्मा सोसायटीच्या परिसरात सुरुवातीला दिसून आला. कुत्र्यांच्या हल्ल्यात हा गवा जखमी झाला असून, वनविभाग आणि महापालिकेचे पथकाने रेस्क्यू ऑपरेशन हाती घेतले आहे.

वाट चुकलेला गवा पुण्यातील महात्मा सोसायटीच्या परिसरात दिसून आला. कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला चढवला होता. यात तो जखमी झाला आहे. जखमी अवस्थेतील गव्याला वाचवण्यासाठी वनविभागाचे पथक आणि महापालिकेचे पथक तातडीने महात्मा सोसायटीच्या परिसरात पोहोचले. गव्याला पकडण्यासाठी शर्थीच्या प्रयत्न सुरू आहेत. सोसायटीतील दोन बंगल्यांमधील मोकळ्या जागेत तो दिसला आहेत. त्यापूर्वी गव्याने बंगल्यांचे गेट देखील तोडले आहेत. गव्याला बेशुद्ध करण्यासाठी पथकातील कर्मचारी प्रयत्नशील आहेत. क्रेनदेखील मागवण्यात आली आहे. दरम्यान, या गव्याला पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here