नवी दिल्ली: भारताचा क्रिकेटपटू () ने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. पार्थिवने जेव्हा भारतीय संघाकडून कसोटीत पदार्पण केले होते तेव्हा तो सर्वात कमी वयाचा विकेटकिपर होता. त्याने १७ वर्ष आणि १५३व्या दिवशी पदार्पण केले होते.

वाचा-

देशांतर्गत क्रिकेटमध्ये पार्थिव गुजरातकडून खेळायचा. भारतीय संघात संधी मिळण्याचे पार्थिवने अनेकदा प्रयत्न केले. पण त्याला यश आले नाही. त्यानंतर तो आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेट खेळू लागला. २०१५च्या आयपीएलमध्ये त्याने ३३९ धावा केल्या होत्या. तेव्हा मुंबई संघाकडून त्याने सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्याच वर्षी मुंबई संघाने आयपीएलचे विजेतेपद देखील मिळवले होते.

वाचा-

विजय हजारे ट्रॉफीत त्याने शतक झळकावले होते आणि गुजरातला विजेतेपद मिळून दिले होते. पार्थिवने फेब्रुवारी २०१६ मध्ये अखेरची आंतरराष्ट्रीय मॅच खेळली होती. तेव्हा वृद्धीमान सहाला दुखापत झाली होती म्हणून पार्थिवला संघात स्थान मिळाले होते. नुकत्याच झालेल्या आयपीएलच्या १३व्या हंगामात तो रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघात होता. पण त्याला अंतिम ११ मध्ये संधी मिळाली नाही.

पार्थिवने भारतीय संघाकडून २५ कसोटी सामने खेळले असून त्यात त्याने ३१.१३च्या सरासरीने ९३४ धावा केल्या. यात ६ अर्धशतकाचा समावेश आहे. ७१ ही त्याची सर्वोत्तम खेळी असून त्याने ६२ कॅच आणि १० स्टपिंग केले. ३८ वनडेत त्याने २३.७४च्या सरासरीने ७३६ धावा केल्या. ९५ ही त्याची वनडेतील सर्वेत्तम खेळी आहे. पार्थिवने वनडेत ३० कॅच तर ९ स्टपिंग केले आहेत. प्रथम श्रेणीत त्याने १८७ सामन्यात ४३.३६च्या सरासरीने १० हजार ७९७ धावा केल्या. २०६ ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. प्रथम श्रेणीत त्याने २६ शतक आणि ५९ अर्धशतक केली आहेत. तर ४६६ कॅच आणि ७६ स्टपिंग केलेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here