म. टा. प्रतिनिधी, : जिल्ह्यातील तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील आदर्श शिक्षक किशोर पाटील-कुंझरकर यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. मंगळवारपासून ते बेपत्ता होते. कुंझरकर यांचा शिवारात मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. कपडे फाटलेले व अंगावर जखमांच्या खुणा असल्याने घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे.

किशोर पाटील- कुंझरकर एरंडोल तालुक्यातील गालापुर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. जळगाव जिल्हा परिषदेच्या आदर्श शिक्षक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. कुंझरकर हे प्रयोगशील शिक्षक म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या पत्नीदेखील शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. करोना काळात कुंझरकर हे विद्यार्थ्यांना घरोघरी जावून शिकवत होते. ते शिक्षक संघटनेचे कामदेखील करीत होते.

काल, मंगळवारी ते गालापूर येथील शाळेत गेले होते. त्यानतंर ते भुसावळ येथे अनिल चौधरी यांच्या वाढदिवसाला देखील उपस्थित असल्याचे सांगितले जात आहे. घरी परतल्यानंतर सायंकाळी ते घरातून कुणाला काहीही न सांगता निघून गेले होते. तेव्हापासून ते बेपत्ता होते. आज बुधवारी पहाटे संशयास्पद स्थितीत त्यांचा मृतदेह पळासदळ शिवारात आढळून आला. कुझंरकर यांचे अंगावरील कपडेही फाटलेले होते. तसेच त्यांच्या डोक्याला मार लागलेला असून, अंगावर जखमांच्या खुणा आहेत. घटनेची माहीती मिळताच स्थानिक पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पुढील तपास सुरू आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here