मुंबई: ज्येष्ठ अभिनेते यांनी केलेल्या टीकेला प्रसिद्ध अभिनेते यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. नसीरुद्दीन शहा यांची विधानं मी गंभीरपणे घेत नाही. त्यांचं संपूर्ण आयुष्य नैराश्य आणि वैफल्यग्रस्तेत गेलं आहे. त्यामुळे त्यांना गंभीरपणे घेण्याचा प्रश्नच येत नाही, असा पलटवार करतानाच माझ्या रक्तात फक्त हिंदुस्थान आहे, असा टोला अनुपम खेर यांनी नसीरुद्दीन शहा यांना लगावला आहे.

नसीरुद्दीन शहा यांनी केलेल्या टीकेनंतर अनुपम खेर यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट करून शहा यांना प्रत्युत्तर दिलं आहे. खेर यांनी ट्विटरवर १ मिनिट २८ सेकंदाचा एक व्हिडिओ अपलोड करून उत्तर दिलं आहे. नसीरुद्दीन शहा यांनी माझ्याबाबत दिलेली मुलाखत पाहिली. त्यांनी माझं कौतुक करताना मला जोकर, मनोरुग्ण म्हटलं. मला गंभीरपणे न घेण्याचा सल्लाही त्यांनी दिला. मी मनोरुग्ण असून हा गुण माझ्या रक्तातच आहे, असंही त्यांनी मला म्हटलं. त्याबद्दल त्यांचं मी आभारच मानतो, असं खेर यांनी म्हटलं आहे.

नसीरुद्दीन शहा माझ्यापेक्षा वयाने आणि अनुभवानेही मोठे आहेत. मी नेहमीच त्यांच्या अभिनयाची आणि कलेची इज्जत करतो आणि करत राहील. मात्र कधी कधी दोन शब्दात कान टोचणंही महत्त्वाचं असतं. मी त्यांचं म्हणणं कधीच गंभीरपणे घेत नाही. कधीच त्यांच्याबद्दल वाईट मत व्यक्त केलेलं नाही. पण आता मला बोलायचं आहे, असं सांगतानाच तुम्ही दिलीप कुमार, अमिताभ बच्चन, राजेश खन्ना आणि विराट कोहलींवरही टीका करता. याचा अर्थ मी चांगल्या कंपनीत आहे, असा होतो. यापैकी कुणीही तुमच्या विधानाला गंभीरपणे घेतलेलं नाही. कारण काही पदार्थांचं सेवन केल्यानंतर चूक काय आणि बरोबर काय हे तुम्हाला कळत नाही. त्याचा तुम्हाला अंदाज येत नाही. त्यामुळेच तुमच्या टीकेवर कुणी प्रतिक्रिया व्यक्त करत नाहीत. तुम्ही प्रचंड यश मिळवल्यानंतरही तुमचं संपूर्ण आयुष्य नैराश्यात घालवलं. त्यातूनच या टीका होत असाव्यात, असा टोलाही खेर यांनी हाणला. माझ्यावर टीका करून एक-दोन दिवस तुम्ही चर्चेत येत असाल तर तुम्हाला हा आनंद मी नक्कीच भेट म्हणून देतो. तुम्ही माझ्या रक्तात काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला. माझ्या रक्तात दुसरं तिसरं काही नाही तर फक्त हिंदुस्थान आहे, असंही खेर म्हणाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here