सोलापूरः पुरस्कार प्राप्त केलेल्या रणजितसिंह डिसले यांना करोनाची बाधा झाली असून त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती.

रणजीत डिसले हे नुकतेच मुंबईहून सोलापूरला त्यांच्या मुळ गावी परतले होते. बार्शीला परतल्यानंतर त्यांना करोनाची लक्षणं जाणवत होती. त्यांनी स्वतःहूनच ही माहिती दिली असून तसं व्हॉट्सअॅप स्टेटस त्यांनी ठेवलं आहे. लक्षणे दिसत असल्यानं मी कोव्हिड टेस्ट करुन घेतली असून ती पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सगळ्यांनी करोना चाचणी करुन घ्यावी असं आवाहन डिसले यांनी केलं आहे. दरम्यान, त्यांच्या पत्नीची कोरोना चाचणीही पॉझिटिव्ह आली असून बाकीच्या घरातील सर्व मंडळींचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आला.

दरम्यान, ग्लोबल टीचर पुरस्कार मिळाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रणजितसिंह डिसले सत्कार केला. या वेळी डिसले यांच्या आई पार्वती, वडील महादेव डिसले यांचाही सत्कार करण्यात आला. जागतिक स्तरावरील सर्वोच्च पुरस्कारप्राप्त रणजितसिंह डिसले यांच्यासारखे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून शिक्षण क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग राबवणाऱ्या राज्यातील शिक्षकांना सोबत घेऊन शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत अव्वल दर्जाचे शिक्षण पोहचवण्यासाठी आराखडा तयार करावा, असे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here