मुंबई- बिग बॉस १३ मधून जर कोणत्या स्पर्धकाला कमालीची लोकप्रियता मिळाली असेल तर ती म्हणजे आहे. पंजाबहून आलेल्या शहनाजला त्या सीझनमध्ये तुफान स्टारडम मिळालं होतं. तिच्या नावाची क्रेझ अजूनही चाहत्यांमध्ये दिसते. आपल्या प्रेमळ आणि सतत बडबड्या स्वभावामुळे सोशल मीडियावर तिचं फॅन फॉलोइंगही प्रचंड आहे. बिग बॉसच्या घरात शहनाजने घरातील इतर स्पर्धकांसोबतच प्रेक्षकांचंही भरभरून मनोरंजन केलं.

१३ वा सीझन संपून आता १४ सीझनही सुरू झाला. पण तरीही लोक शहनाजला विसरलेले नाहीत. म्हणूनच यशराज मुखाटे याने शहनाजच्या बिग बॉसच्या घरातल्या एका डायलॉगवर रॅप केलं. यात ती बोलताना दिसते की, ‘तुम्हारी फीलिंग तुम्हारी, , साड्डा कुत्ता कुत्ता? क्या करूं मैं मर जाऊं? मेरी कोई फीलिंग नहीं है?’

यशराजने शहनाजच्या या डायलॉगवर एक मजेदार रॅप केलं आहे. सध्या हे अॅप सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे. त्याने दिलेल्या स्पेशल टचने या डायलॉगमध्ये भर पडली आहे. यात काही शंका नाही. यशराज मुखाटे याने आपल्या इन्स्टाग्राम अकाउन्टवर हा रॅप शेअर करताना लिहिले की, ‘टॉमी, दु:ख, वेदना, अश्रू, भावना … शहनाज गिल कोणत्याही भाषेत पंजाबी बोलू शकतात. ती जे काही बोलते त्यात भांगडा दिसतो. मग मी हे कसं चुकवलं असतं?’

तिच्या डायलॉगवर बनलेला हा रॅप पाहून शहनाज गिल तिचं हसू थांबवू शकली नाही. तिने या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना लिहिले की, Burahhhh..LOL.. समीर रेड्डीपासून निमृत कौर अहलुवालिया, तन्मय भट्ट, निक्की वालिया, आशिष चौधरी, फलक नाझ अशा अनेक सेलिब्रिटींनी यशराजच्या या रॅपचं कौतुक केलं आहे. ही बातमी लिहेपर्यंत व्हिडिओला २२ लाखांहून अधिक लोकांनी पाहिले होते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here