कोच्ची: जगभरातील विविध देशांमध्ये हाहाकार माजवणाऱ्या (Covid-19) या विषाणूने केंद्रशासित प्रदेश असलेल्या लक्षद्वीपच्या (Lakshadweep) एकाही व्यक्तीला स्पर्श केलेला नाही. लक्षद्वीपमध्ये जनजीवन नेहमीप्रमाणे अतिशय सामान्य आहे. येथे आतापर्यंत करोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही (No Corona Patient in Lakshadweep). ना मास्क, ना सॅनिटायझर आणि कोविड-१९ च्या इतर अनेक नियम आणि बंधनांचा कोणताही प्रकार इथे दिसत नाही. लग्न समारंभापासून ते इतर अनेक कार्यक्रमांतर्गत येथे लोक नेहमी सारखेच एकमेकांना भेटतात. (no has been found in so far)

कठोर नियमांमुळे आहे करोनामुक्त

लक्षद्वीपमध्ये सर्वकाही सर्वसामान्यपणे होत आहे याचे कारण अरबी समुद्रात असलेल्या या द्वीपावर लोकांनी सहज प्रवेश करू नये म्हणून एसओपीचे अतिशय कठोरपणे पालन केले जाते. लोकसभेत लक्षद्वीपचे प्रतिनिधीत्व करणारे खासदार पी. पी. मोहम्मद फैजल यांनी दिलेल्या माहितीनुसार, या वर्षाच्या सुरुवातीलाच लक्षद्वीपने कोविड-१९ च्या महासाथीला रोखले होते. ८ डिसेंबरपर्यंत लक्षद्वीपमध्ये एकही रुग्ण आढळलेला नाही.

सर्वसामान्य असो किंवा खासदार, ७ दिवस क्वारंटीन राहिल्यानंतरच प्रवेश
फैजल यांनी सांगितले की, ‘आम्ही घेतलेल्या काळजीमुळे आतापर्यंत लक्षद्वीपमध्ये करोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही.’ कडक नियमांचे पालन केल्यानंतरच ३६ वर्ग किलोमीटरच्या या द्वीपावर प्रवेश मिळू शकतो. मग ती एक सर्वसामान्य व्यक्ती असो किंवा मग अधिकारी वा जनप्रतिनिधी. सर्वांनाच कोच्चीमध्ये सात दिवसांसाठी क्वारंटीन राहण्याबरोबरच इतर अनेक नियमही पाळावे लागतात.

क्लिक करा आणि वाचा-

लक्षद्वीपमध्ये सुरू होत आहेत शाळा-महाविद्यालये

कोच्ची हा एक असा पॉइंट आहे जेथे जहाज किंवा मग हेलिकॉप्टरद्वारे द्वीपापर्यंत जाता येते. द्वीपावर मात्र लोकांसाठी कोणत्याही प्रकारचे नियम आणि बंधने नाहीत. ना मास्क, ना सॅनिटायझर… कारण हे एक हरित क्षेत्र असल्याचे फैजल यांनी सांगितले. लक्षद्वीप अशी एकमात्र जागा आहे जेथे शाळा सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे २१ सप्टेंबरपासून शाळा उघडण्याची परवानगी दिली होती.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here