हैदराबाद: ब्रिटनमध्ये करोनाची लस () टोचण्याची प्रक्रिया सुरू झालेली असताना, दुसरीकडे भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये लस निर्मितीच्या अंतिम टप्प्यात आहे. भारतात तीन औषध निर्मिती कंपन्यांनी नियामक संस्थांकडे कोविडच्या लशीच्या () आणीबाणीतील वापराची परवानगी मागितली आहे. दरम्यान, बुधवारी नवी दिल्लीहून एकूण ६४ देशांच्या राजदूतांनी हैदराबाद येथील (Bharat Biotech) आणि बायॉलॉजिकल ई लिमिटेडचा दौरा केला. (64 countrys embassy representatives in india visited lab)

भारत बायोटेकच्या अधिकाऱ्यांनी ६४ देशांच्या राजदूतांना लॅब दाखवली. तसेच करोना लशीच्या निर्मितीबाबत माहिती दिली. भारतात तीन औषध निर्मात्या कंपन्या कोविड लशीची निर्मिती करत आहेत. यापूर्वी भारत सरकारने गेल्या ६ नोव्हेंबरला राजदूतांना कोविड-१९ चा संसर्ग रोखण्यासाठी आपल्याद्वारे उचलण्यात आलेल्या पावलांबाबत माहिती दिली.

‘या’ देशांचे राजदूतांचा दौऱ्यात सहभाग

हैदराबादला भेट देणाऱ्या राजदूतांमध्ये ऑस्ट्रेलिया, डेन्मार्क, ईराण, भूतान, ब्राझील, म्यानमार, स्लोव्हेनिया, त्रिनिदाद आणि टोबॅगो, दक्षिण फोरिया, अफगाणिस्तान, श्रीलंका आणि इतर देशांच्या राजदूतांचा समावेश आहे.

क्लिक करा आणि वाचा-

देशी लशीला मिळणार खरेदीदार?

या दौऱ्याच्या माध्यमातून भारत आपल्या लस निर्मितीची क्षमताही परदेशी प्रतिनिधींना दाखवणार तर आहेत, पण सोबतच जगभरातील बाजारा शोधण्याचाही भारताचा प्रयत्न असणार आहे. या दौऱ्याशी संबंधित एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या दौऱ्याच्या माध्यमातून आफ्रिका, दक्षिण-पूर्व आशिया आणि मध्य आशियातील देशांमध्ये भारतीय लशीसाठी संभाव्य ग्राहक शोधणे हा देखील प्रयत्न होणार आहे.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here