सुप्रीम कोर्टाच्या ५ न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर आज मराठा आरक्षणावर सुनावणी झाली. न्यायमूर्ती अशोक भूषण, एल. नागेश्वर राव, एस. अब्दुल नझीर, हेमंत गुप्ता आणि रविंद्र भट या न्यायमूर्तींचा या घटनापीठात समावेश आहे. या प्रकरणी अॅटर्नी जनरल केके वेणुगोपाल यांनी सहाय्य करावं, कोर्टाने सांगितलं.
प्रकरणी लवकरात लवकर सुनावणी पूर्ण केली जाईल. या प्रकरणी २५ जानेवारीपासून शेवटी सुनावणी घेण्यात येईल, असं सांगत सुप्रीम कोर्टाने आरक्षणावरील स्थगिती कायम ठेवली. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने राज्यातली नोकर भरतीच्या प्रक्रियेलाही ब्रेक लागला आहे. कोर्टाने स्थगितीपूर्वीचा नोकरभरतीलाही परवानगी देण्यास नकार दिला आहे. यामुळे राज्यातली महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारला मोठा झटका बसला आहे.
सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाविरोधात दोन याचिका करण्यात आल्या आहेत. एक याचिका ही जे लक्ष्मण राव पाटील यांनी केली आहे. पाटील यांनी मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं आहे. मुंबई हायकोर्टाने मराठा आरक्षणाच्या बाजूने निर्णय दिला होता. मराठा आरक्षणप्रकरणी दुसरी याचिका ही संजय शुक्ला यांनी केली आहे. त्यांनीही याचिकेद्वारे मराठा आरक्षणाला विरोध केला आहे. आरक्षण ५० टक्क्यांवर जात असल्याचं त्यांनी म्हटलंय.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times