वाचा:
फोर्ट परिसरात जवळ या इमारतीत तळमजल्यावर किताबखाना हे दुकान आहे. दीडशे वर्षांची परंपरा असलेल्या या दुकानाशी हजारो पुस्तकप्रेमींचं अतुट नातं असून आगीच्या घटनेने या सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. आगीत पुस्तकांचा मोठा संग्रह जळून खाक झाल्याचे सांगण्यात येत आहे. सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास ही आग लागली. याबाबत माहिती मिळताच तातडीने अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. ८ फायर इंजिन, सहा जंबो टँकर्स व अॅम्ब्युलन्स रवाना करण्यात आली. सर्वप्रथम इमारतीमधून ३० जणांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले. त्यानंतर शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली गेली असून दुकानाचे प्रचंड नुकसान झाले आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार किमान १ कोटींचे साहित्य आगीत खाक झाले आहे.
वाचा:
या घटनेने हादरले आहे. या दुर्घटनेबाबत व्यवस्थापनाने ट्वीटरच्या माध्यमातून माहिती दिली आहे. ‘किताबखाना दुकानात आग लागली असून आता परिस्थिती नियंत्रणात आली आहे. पुस्तकांचे किती प्रमाणात नुकसान झाले आहे, हे आत्ताच सांगता येणार नाही. मात्र, आमचा सर्व स्टाफ सुरक्षित आणि सुखरूप आहे ही सध्यातरी आमच्यासाठी सर्वात महत्त्वाची बाब आहे. आगीच्या घटनेमुळे तूर्त आम्हाला दुकान बंद ठेवावं लागणार असून ग्राहकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत’, असे ट्वीट किताबखानाच्या अधिकृत ट्वीटर हँडलवर करण्यात आले आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times