वाचा:
नगर-पुणे महामार्गावरील येथे सोमवारी (३० नोव्हेंबर) रात्री आठ वाजताच्या सुमारास रेखा जरे यांची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात पाच आरोपी अटकेत असून मुख्य सूत्रधार पसार आहे. रेखा जरे हत्या प्रकरणात बोठे याचे नाव ३ डिसेंबर रोजी आले होते. तेव्हापासूनच पोलीस बोठे याच्या मागावर असून त्याच्याविरुद्ध लूक ऑऊट नोटीस सुद्धा बजावली गेली आहे. बोठे याचा पासपोर्ट पोलिसांनी जप्त केला आहे. तसेच त्याचा कसून शोध पोलिसांकडून घेण्यात येत असून नगर जिल्ह्यासह जिल्ह्याच्या बाहेर देखील पथके पाठवण्यात येत आहेत. मात्र, पोलिसांना गुंगारा देण्यात आरोपी बोठे यशस्वी होत आहे.
वाचा:
गेल्या सात दिवसांपासून बाळ बोठे पोलिसांच्या हाती लागलेला नाही. पोलिसांना गुंगारा देत असतानाच आरोपी बोठे याने न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी अर्ज केला आहे. आता या अर्जावर ११ डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे आता आरोपी बोठे याला पकडण्याचे आव्हानच पोलिसांसमोर उभे राहिले असून त्याचा शोध घेण्याची जोरदार मोहीमच पोलिसांनी हाती घेतली आहे. मात्र, पोलिसांच्या या मोहिमेला यश येणार का, याकडे लक्ष लागले आहे.
तीन आरोपींना ११ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी
रेखा जरे हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या पाच पैकी , ऋषिकेश पवार व आदित्य चोळके या तीन आरोपींची पोलीस कोठडी संपल्याने बुधवारी त्यांना न्यायालयासमोर हजर केले होते. यावेळी न्यायालयाने या तिन्ही आरोपींच्या पोलीस कोठडीत ११ डिसेंबरपर्यंत वाढ केली आहे. तर, या प्रकरणातील आणखी दोन आरोपी फिरोज शेख व ज्ञानेश्वर शिंदे हे दोघे न्यायालयीन कोठडीत आहेत.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times