म. टा. प्रतिनिधी, जळगाव: बीएचआर क्रेडीट सोसायटीमधील ( ) ठेवीदारांच्या पावत्या विकत घेवून कोट्यावधीचा अपहार करणारे अवसायक जितेंद्र कंडारे व सुनिल झंवर हे केवळ प्यादे आहेत. यातील मूळ सुत्रधार शोधण्याची गरज आहे. ज्यांचे पाप आहे ते उघड्यावर आले पाहीजे, अश्या शब्दात राष्ट्रवादीचे माजी मंत्री डॉ. यांनी बीएचआर घोटाळ्याप्रकरणी तोफ डागली आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्तच्या कार्यक्रमांची माहीती देण्यासाठी जळगाव राष्ट्रवादी कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलतांना डॉ. सतीश पाटील यांनी ही माहीती दिली. यावेळी जिल्हाध्यक्ष अड. रविंद्र पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर,माजी आमदार दिलीप वाघ, मनिष जैन अभिषेक पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमांची माहीती देण्यात आली.

बीएचआर घोटाळ्याबाबत पुढे बोलतांना डॉ. सतीश पाटील यांनी सांगीतले की, ज्या लोकांनी पतसंस्थेवर विश्वास ठेवून ठेवी ठेवल्यात ते लोक आता हतबल झाले आहेत. या ठेवींच्या जोरांवर अनेकांनी लाखोंच्या मालमत्ता जमा केल्यात. याचा तपास पाहीजे तितक्या जोरात अद्याप होत नाहीय. पुण्यात २५ कोटीची एक जागा केवळ ९० लाखाला खरेदी करण्यात आली आहे. या अपहारातील अवसायक कंडारे व सुनिल झंवर हे केवळ प्यादे असून यातील मूळ सुत्रधार समोर आणण्याची आवश्यकता असल्याचेही पाटील यांनी सांगीतले. अवसायक कंडारे, सुनिल झंवर सापडत का नाही ? त्यांना पोलिसांनीच लपविले का ? त्यांना शोधलेच पाहीजे. ठेवीदारांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादीकडून या प्रकरणाचा पर्दापाश करण्याचा कार्यक्रमच हाती घेतला जाईल असेही पाटील म्हणाले.

बारामतीला गेलेला तो कोण ?

बीएचआर गैरव्यवहार प्रकरणी शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र देवून कुणालाही पाठीशी घालू नका, असे सांगणार असल्याचेही पाटील यांनी सांगीतले. विशेष म्हणजे या प्रकरणाशी संबधित एक मातब्बर बारामतीला गेल्या असल्याची चर्चा होती. याबाबत देखील अध्यक्ष शरद पवार यांनी तो कोण होता? असे आपण विचारणार असल्याची माहिती सतीष पाटील यांनी दिली.

मी थकबाकीदार नाही- अड. पाटील

दरम्यान बीएचआर पतसंस्थेतून आपण कर्ज घेतले होते. मात्र, हे कर्ज निरंक केले असल्याने आपण थकबाकीदार नसल्याचा खुलासा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अड.रविंद्र पाटील यांनी सांगीतले. यावेळी महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी देखील कर्ज फेडल्याचे सांगत सध्या व्हायरल झालेली थकबाकीदारांची यादी २०१४ मधील असल्याची माहीती दिली.

नाराजी नाहीच- डा. सतिष पाटील

राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीच्या दिवशी बाहेरगावी असल्याने येता आले नाही, तसेच कुणी माझे नाव फलकावर टाकले नाही म्हणून आपली नाराजी नसल्याचा खुलासा माजी सतिष पाटील यांनी यावेळी केला. काहीही झाले तरी माझे ऐकमेव नेते शरद पवार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here