राज्यमंत्री बच्चू कडू हे ग्वाल्हेरहून पलवल येथे जाण्यासाठी निघाले. भरतपूर मार्गे ते पलवल येथे जात होते. पण यूपी पोलिसांनी त्यांना रोखलं. राजस्थान आणि उत्तर प्रदेशच्या सीमेवर धौलपूर येथे पोलिसांना पुढे जाण्यास मनाई केली. अग्रा आणि पुढील काही भागात चक्का जाम असल्याचं कारण यूपी पोलिसांनी दिलं. पोलिसांनी त्यांना पर्यायी मार्गाने जाण्यास सांगितलं. पण दिल्ली जणाऱ्या सर्व मार्गांवर पोलिसांचा बंदोबस्त आहे.
शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी निघालेल्या राज्यमंत्री बच्चू कडू यांना रस्त्यात ठिकठिकाणी शेतकऱ्यांकडून समर्थन मिळत आहे. यामुळे पोलिसांना त्यांना रोखल्याचं बोललं जातंय. बच्च कडू यांना रात्रीचा मुक्कामक भरतपूरमध्ये करावा लागला. आता आज ते हजारो समर्थकांसह पलवलला रवाना होतील, असं सांगण्यात आलं.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times