पुणे: राज्यात आगामी निवडणुका महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी एकत्र लढल्यास भारतीय जनता पक्षाला ५० पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत, असे मत काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री यांनी येथे व्यक्त केले. (NCP State Chief Targets BJP )

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नियोजित कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांवर पाटील यांनी उत्तरे दिली.

वाचा:

भारतीय जनता पक्षाला हैदराबाद आणि राजस्थान येथे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या झालेल्या निवडणुकीत चांगले यश मिळाले आहे. आता भाजपने मिशन मुंबईचा नारा दिला आहे. त्याबाबत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, ” नुकत्याच झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची ताकद दिसून आली आहे. आगामी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सोबत लढली, तर भाजपचे ५० आमदार सुद्धा निवडून येणार नाहीत.” राजस्थान आणि हैदराबाद येथील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक मुद्दे काय होते, काँग्रेसमधील स्थानिक पातळीवरील अंतर्गत धुसफूस होती का, हे मुद्दे विचारात घ्यावे लागतील, असेही त्यांनी पुढे नमूद केले.

वाचा:

दरम्यान, नुकतीच विधान परिषदेचे तीन पदवीधर मतदारसंघ आणि दोन शिक्षक मतदारसंघात निवडणूक पार पडली. या निवडणुकीत महाविकास आघाडीने मोठे यश मिळवत पाच पैकी चार जागा जिंकल्या. या निकालाने भाजपला जोरदार धक्का बसला असताना महाविकास आघाडीचा आत्मविश्वास मात्र वाढला आहे. त्यातूनच जयंत पाटील यांनी भविष्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांबाबत हे भाष्य केले आहे.

आठ दशके कृतज्ञतेची…
शरद पवार यांच्या ८०व्या वाढदिवसानिमित्त १२ डिसेंबर रोजी ‘आठ दशके कृतज्ञतेची’ हा देदीप्यमान कार्यक्रम डिजिटल स्वरूपात राज्यभरात आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी जयंत पाटील यांनी दिली. मुख्य कार्यक्रम हा मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे सकाळी ११ वाजेपासून होणार असून संपूर्ण महाराष्ट्रात व्हर्च्युअल माध्यमातून कार्यक्रम दाखवण्यात येईल. पक्षाच्या नवीन वेबसाइटचे उद्घाटन आणि ‘ऑनलाइन मेंबरशिप’ या उपक्रमांची सुरुवातही कार्यक्रमात होईल, असे पाटील यांनी नमूद केले. राज्यात निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी १३ ते २० डिसेंबर दरम्यान पक्षाच्या वतीने राज्यभर रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते रक्ताचा तुडवडा भरून काढतील, असा विश्वास पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. करोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील आदिवासी भागात एक लाख मेडिकल किट्सचे वाटप करण्यात येणार आहे. विधिमंडळाचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना मेडिकल कीट देऊन या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here