सांगली शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात वाढलेल्या आणि घरफोडीच्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर सराईत गुन्हेगारांच्या हालचालींवर नजर ठेवली होती. यावेळी वाल्मिकी आवास येथील विश्वनाथ उर्फ बाबू काळे याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. अधिक चौकशीत त्याने सहा गुन्ह्यांची कबुली दिली. विशेष म्हणजे २० दिवसांपूर्वीच त्याची जामिनावर मुक्तता झाली होती. २० दिवसांत त्याने सहा गुन्हे केले. सातारा जिल्ह्यातील वाठार येथे मध्यवर्ती बँकेतही त्याने चोरी केली. त्याने कॉलेज कॉर्नर, कर्नाळ रोड आणि सातारा जिल्ह्यातील वाठार येथून दुचाकींची चोरी केल्याची कबुली दिली.
पोलिसांनी त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली कटावणी जप्त केली. चोरीचा मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई पोलिसांकडून सुरू आहे. यापूर्वी त्याच्यावर चोरीचे १४ गुन्हे दाखल आहेत. त्याने सांगलीसह सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातही घरफोड्या केल्या आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नीलेश वागाव, अविनाश मते यांच्यासह हवालदार दिलीप जाधव, गुंडोपंत दोरकर, संदीप पाटील, झाकीर काझी, सचिन घाटके, आदींनी केली.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times