सिलचर : एकिकडे भारताच्या उत्तर भागात ‘लव्ह जिहाद’ कायद्याच्या निमित्तानं हिंदू विरुद्ध मुस्लीम अशी दरी रुंदावताना दिसत असतानाच भारताच्या पूर्व भागातही हिंदुत्ववादी संघटना आक्रमक स्वरुप धारण करताना दिसत आहेत. आसामच्या कछार जिल्हा प्रशासनानं पोलिसांना बजरंग दलाच्या एका स्थानिक नेत्याच्या कथित भडकावू भाषणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. हिंदुत्ववादी संघटना बजरंग दलाच्या एका नेत्याचं कथित भडकावू भाषण सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाकडून हे आदेश देण्यात आले आहेत. हा भाग मानला जातो.

ही बजरंग दलाची मूळ संघटना आहे. या व्हिडिओत बजरंग दलाचे कछारचे प्रभारी मिथून नाथ यांनी हे वक्तव्य केल्याचं समोर येतंय. या भाषणात संबंधित नेता ख्रिसमसच्या निमित्तानं चर्चमध्ये जाणाऱ्या हिंदूंना मारहाण करण्याची धमकी देताना दिसत आहे.

दक्षिणपंथी संघटना बजरंग दलाच्या नेत्यानं गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला कछार जिल्ह्यतील सिलचरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात ”च्या घोषणा देतानाच सोहळ्यात भाग घेण्यासाठी चर्चमध्ये जाणाऱ्या हिंदूंना मारहाण करण्याची धमकी दिली होती.

ख्रिश्चन बहुल राज्य मेघालयची राजधानी शिलाँगमध्ये (रामकृष्ण मिशनचा एक भाग) कथितरित्या बंद होण्यावर जाहीररित्या नाराजी व्यक्त केली. तसंच ‘क्रिसमसच्या दिवशी होणाऱ्या कार्यकमांत तसंच उत्सवांत हिंदूंना सहभागी होण्याची परवानगी दिली जाणार नाही’ असंही वक्तव्य त्यांनी केलंय.

वाचा : वाचा :

सोबतच ‘चर्च जाणाऱ्या हिंदूंना मारहाणीला सामोरं जावं लागेल कारण अशा हिंदूंची मी निंदा करतो. जे आपल्या धार्मिक स्थळांना बंद करणाऱ्या लोकांच्या ख्रिसमस कार्यक्रमात जाणार आणि मजा करणार. कोणताही हिंदू या ख्रिसमसला चर्चमध्ये जाणार नाही, हे आम्ही सुनिश्चित करू. त्यांना चांगलाच धडा शिकवू’ असं प्रक्षोभक वक्तव्य करताना मिथून नाथ कॅमेऱ्यात कैद झालेत.

‘जर आम्ही असं करताना हिंदूंवर हल्ला केला तर मला माहीत आहे की पुढच्या दिवशी वर्तमानपत्रांची हेडलाईन असेल, गुंडादलानं ओरिएंटल शाळेत दुष्कृत्य केलं. परंतु, ही आमची प्राथमिकता नाही. शिलाँगमध्ये मंदिराचे टाळे बंद होत राहतील तेव्हापर्यंत आम्ही ख्रिसमस दरम्यान होणाऱ्या कार्यक्रमात हिंदूंना जाण्याची परवानगी देणार नाही’ असंही त्यांनी म्हटलंय.

दरम्यान, मेघालय सरकारच्या काही अधिकाऱ्यांनी मात्र हिंदू संघटनेचा हा दावा फेटाळून लावलाय. ‘जिल्हा हॉलिडे असताना एका सांस्कृतिक केंद्राचा दरवाजा बंद करण्यात आला होता. त्याला टाळं ठोकण्यात आलं नव्हतं तसंच रामकृष्ण मिशनच्या कोणतीही मंदिरं बंद करण्यात आलेली नाहीत’ असं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय.

कछारच्या उपायुक्त कीर्ति जल्ली यांच्या म्हणण्यानुसार, व्हिडिओ समोर आल्यानंतर त्याची दखल घेऊन पोलीस अधीक्षकांना आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंदुत्ववादी नेत्याविरुद्ध अद्याप आपल्याकडे कोणतीही तक्रार आलेली नाही. मात्र, व्हिडिओची चौकशी सुरू करण्यात आलीय.

वाचा : वाचा :

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here