अहमदनगरः भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा यांना शिर्डीच्या प्रांताधिकाऱ्यांनी तीन दिवस शिर्डीत प्रवेशबंदी घातली असली तरी तो आदेश धुडकावून शिर्डीत येण्याची तयारी देसाई यांनी केली आहे. तृप्ती देसाई आज सकाळीच शिर्डीसाठी रवाना झाल्या होत्या. दरम्यान, शिर्डी प्रवेशापूर्वीच त्यांना सूपा टोलनाक्या जवळ पोलिसांनी अडवले आहे.

तृप्ती देसाई व भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी सुपे टोलनाक्याजवळ रोखलं असून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. कायदा व सुव्यवस्था टिकून राहण्यासाठी पोलिसांनी हा निर्णय घेतला असल्याचं सांगण्यात येत आहे. तृप्ती देसाई यांना सुपे पोलिस ठाण्यात नेण्यात आलं आहे. सुपा पोलिस स्टेशनचे प्रवेशद्वार पोलिसांनी केले बंद. माध्यमांना पोलीस स्टेशनमध्ये जाण्यास रोखले आहे.

‘नगरच्या वेशीवर आम्हाला रोखणं पूर्णपणे चुकीचे आहे. आम्ही आमच्या हक्कांसाठी लढत आहोत. साई संस्थानावर कारवाई करुन त्यांना ताब्यात घेतलं पाहिजे होत. आम्हाला कितीही थांबवलं तरी आम्ही शिर्डीला जाणारच,’ अशी ठाम भूमिका तृप्ती देसाई यांनी घेतली असून या कारवाईचा निषेध नोंदवला आहे. ‘मला शिर्डी नगरपंचायतीच्या हद्दीत प्रवेशबंदी घातली आहे. त्यामुळं नगरपंचायतीच्या हद्दीत थांबावयला तयार आहे. आमच्या महिला कार्यकर्त्या साई संस्थानात जाऊन बोर्ड काढायला तयार आहे, असंही त्या म्हणाल्या आहेत.

दरम्यान, शिर्डीच्या दिशेने तृप्ती देसाई निघाल्यानंतर शिवसेना महिला आघाडीसह ब्राम्हण महासंघाच्या महिला कार्यकर्त्या , शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक हे शिर्डीत ठाण मांडुन आहेत. देसाई यांनी फलक हटवण्याचा इशारा दिल्याने देसाई यांच्या विरोधात स्थानिक महिला आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी शिर्डीत यावं, बोर्डाला हात लावावा, आम्ही तृप्ती देसाई यांच्या तोंडाला काळ फासणार असे थेट आव्हान शिवसेनेच्या स्वाती परदेशी यांनी केलंय. तर ब्राम्हण महासंघाच्या महिला कार्यकर्त्यांनी तृप्ती देसाई यांना आता शिर्डीत येण्याची परवानगी द्यावी, आम्ही फलकाचे रक्षण करण्यास समर्थ आहोत, त्यांच्या स्टंटला स्टंटनेच उत्तर देणार, असा इशारा महिला ब्राम्हण महासंघाच्या कार्यकर्त्यांनी दिलाय.

शिर्डी येथील साईबाबा मंदिर येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी भारतीय पोषाखात यावे, अशी विनंतीवजा सूचना साईबाबा संस्थानाने भाविकांना केली आहे. यावरून चांगलाच वाद पेटला आहे. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी तर हा बोर्ड संस्थानने काढला नाही तर आम्ही येऊन काढू, असा इशाराच दिला होता. मात्र अद्याप हा बोर्ड हटवण्यात आलेला नाही. त्यामुळे आम्ही १० डिसेंबर रोजी हा बोर्ड काढण्यास येणार असल्याचे देसाई यांनी लेखी पत्रच साई संस्थानला पाठवले होते. त्यानंतर तातडीने व भूमाता ब्रिगेडच्या वादात प्रशासनाने उडी घेत देसाई यांना शिर्डीत येण्यास बंदी घातली होती. तरीही बंदीचा हा आदेश धुडकावत आज शिर्डीसाठी रवाना झाल्या आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here