पुणे: सारेगमप लिट्ल चॅम्पसची विजेती व लाईव्ह शो करणारी आता आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात करत आहे. कार्तिकी नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. कार्तिकीची मैत्रिण आर्या आंबेकर हिनं इन्स्टाग्रामवर विवाह सोहळ्याचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

जुन महिन्यात कार्तिकीच्या घरी कांदेपोह्याचा म्हणजेच पाहण्याचा कार्यक्रम पार पडला होता. या कार्यक्रमाचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. कार्तिकीचे वडिल कल्याणजी गायकवाड यांच्या मित्राच्या मुलासोबत कार्तिकींच लग्न झालं. २६ जुलै रोजी साखरपुड्याचा कार्यक्रम पार पडला होता. असं कार्तिकीच्या पतीचं नाव आहे. रोनित मेकॅनिकल इंजिनिअर असून त्यानं स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे.

कशा जुळून आल्या रेशीमगाठी?‘माझ्या ध्यानीमनी नसताना अगदी अनपेक्षितपणे सगळं घडलं. माझे होणारे सासरे हे वडीलांचे जुने स्नेही आहेत. पत्रिका बघून, बघण्याचा वगैरे कार्यक्रम होऊन हे रीतसर अरेंज्ड मॅरेज ठरलं आहे. आम्हा दोघांची क्षेत्रं खूप वेगळी आहेत. त्यांच्याकडेही संगीताची आवड आहे. कलेविषयी आदर आहे. अगदी स्वत: गाणारे नसले, तरी ते कानसेन आहेत’, असं कार्तिकीनं एका मुलाखतीत म्हटलं होतं.

सारेगमप लिटिल चॅम्स मराठीच्या पहिल्या पर्वाची कार्तिकी विजेती ठरली. कार्तिकी सध्या गायिका म्हणूनआपल्या सर्वांनाच माहीत आहे. कार्तिकीनं ‘गजर कीर्तनाचा’ या कार्यक्रमाची निवेदिका म्हणून प्रेक्षकांसमोर आली होती.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here