मुंबई: राजकीय अस्तित्वासाठी झगडणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं पहिलं महाअधिवेशन आज मुंबईत होतंय. शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या महाआघाडीमुळं बदललेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हे आपल्या पक्षाची नवी भूमिका मांडणार आहेत. ती भूमिका काय असेल, याकडं आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मनसेच्या महाअधिवेशनाचे लाइव्ह अपडेट्स:

>> मनसेच्या व्यासपीठावर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची प्रतिमा, तर्कवितर्कांना उधाण

>> अमित ठाकरे यांना जबाबदारी दिल्यास आनंद होईल – शर्मिला ठाकरे यांचं सूचक वक्तव्य

>> शर्मिला ठाकरे यांचा काहीही बोलण्यास नकार

>> राज ठाकरे नेस्को संकुलात दाखल, थोड्याच वेळात अधिवेशनाला सुरुवात होणार

>> राज ठाकरे संध्याकाळी जाहीर सभेला संबोधित करणार

>> अधिवेशनातील सकाळच्या सत्रात मनसेच्या नव्या झेंड्याचं अनावरण होणार

>> नेस्को संकुलाबाहेर मनसेच्या कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी

>> अधिवेनासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे, पत्नी शर्मिला ठाकरे, पुत्र अमित ठाकरे व आई कुंदा ठाकरे यांच्यासह ‘कृष्णकुंज’वरून रवाना

>> मुंबईतील गोरेगाव येथील नेस्कोच्या मैदानात भरतंय महाअधिवेशन

वाचा:

>> मनसेचं आज राज्यव्यापी महाअधिवेशन, राज ठाकरे यांच्या नव्या भूमिकेकडं लक्ष

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here