गंभीर जखमी अवस्थेत मुलीला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. बऱ्याच ठिकाणी तिला फ्रॅक्चर झाले आहे. प्रकृती चिंताजनक असल्याने तेथील डॉक्टरांनी तिला ट्रॉमा केअरमध्ये दाखल करण्यास सांगितले.
परिसरात मंगळवारी रात्री ही घटना घडली. या घटनेनंतर पोलिसांनी बुधवारी आरोपी तरुणाला अटक केली आहे. रामपूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अरूण कुमार सिंह यांनी सांगितले की, सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परिसरात आरोपी तरूण राहतो. पोलिसांनी त्याला बुधवारी संध्याकाळी अटक केली. त्याच्याविरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.
नेमके काय घडले?
आसरा कॉलनीत मंगळवारी संध्याकाळी १५ वर्षीय मुलगी छतावर कपडे सुकवण्यासाठी गेली होती. त्याचवेळी एका तरुणाने तिला छतावरून खाली फेकून दिले. आरोपी तरूण हा नेहमी तिची छेड काढायचा. मंगळवारी संध्याकाळीही त्याने छतावर असेच कृत्य केले. तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. त्याला मुलीने प्रतिकार केला. त्यावर तरूणाने तिला छतावरून खाली फेकले. यात मुलगी गंभीर जखमी झाली आहे. आरोपी तरूण हा शेजारीच राहतो.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times