नवी दिल्ली : नव्या संसद भवनाच्या निर्माणासाठी आज पायाभरणीचा कार्यक्रम सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत पार पडला. पंतप्रधान मोदींनी केलं. इंडिया गेटजवळ ” कार्यक्रमांतर्गत तयार होणाऱ्या या नव्या भवानाच्या भूमीपूजन कार्यक्रमानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उपस्थितीतांना संबोधित केलं. परंतु, निर्माण कार्य मात्र आत्ताच सुरू होऊ शकणार नाही कारण या संबंधातील एका याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. (Lay Foundation of )

वाचा : सुविधा अपग्रेड केल्या जाणार

उपस्थितांना संबोधताना, ‘आपल्या देशाचं आणि संविधानाचं निर्माण या संसद भवनात झालंय. या संसद भवनानं देशाचे अनेक चढ-उतार, आशा-आकांक्षा पाहिल्यात. देशाच्या प्रवासाचं हेदेखील एक प्रतिक राहिलंय. हे सर्व आपला वारसा आहे, परंतु संसदेच्या सामर्थ्यवान इतिहासाबरोबरच वास्तवही स्वीकारलं जाणं आवश्यक आहे. हे संसद भवन आता विश्राम मागतंय. नव्या निर्माणाच्या माध्यामातून संसद भवन अपग्रेड करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. नवी ध्वनी, आयटी सुरक्षा व्यवस्था वापरण्यात येणार आहे’ असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं.

पंतप्रधान म्हणाले की नवीन संसद भवनात अनेक नवीन कामं केली जात आहेत ज्यामुळे खासदारांच्या कार्यक्षमतेत वाढ होईल. कार्यसंस्कृतीत आधुनिक पद्धत समाविष्ट होईल. जेव्हा नागरिक खासदारांना भेटायला येतात तेव्हा त्यांना सद्य संसद भवनात अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं. संसद भवनात जागेचा अभाव आहे. परंतु भविष्यात प्रत्येक खासदारासाठी अशी व्यवस्था असेल की ते आपल्या संसदीय मतदार संघातील लोकांना भेटू शकतील, असंही यावेळी पंतप्रधानांनी म्हटलंय.

नवीन संसद भवन हे आत्मनिर्भर भारताचा साक्षीदार असेल. जुन्या इमारतीमुळे देशातील आवश्यकता पूर्ण झाल्या परंतु नवीन संसद भवन २१ व्या शतकाच्या आकांक्षा पूर्ण करेल. आम्ही भारतीय लोक एकत्रितपणे आपल्या संसदेची ही नवीन इमारत बनवू… जेव्हा भारत आपल्या स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरी साजरी केरल तेव्हा संसदेची नवीन इमारत होईल त्या महोत्सवाची प्रेरणा ठरेल, याहून पवित्र काय असू शकेल, असे उद्गारही यावेळी पंतप्रधानांनी काढले.

‘इंडिया इज मदर ऑफ डेमोक्रसी’

‘जेव्हा आपण आपल्या लोकशाहीचं गुणगाण करू तेव्हा विश्व म्हणेल ‘इंडिया इज मदर ऑफ डेमोक्रसी’… लोकशाहीमध्ये संवाद असायला हवा. वैचारिक भिन्नता (डिफरन्स) प्रत्येक ठिकाणी असते परंतु संवादाची साखळी तुटू नये. (डिस्कनेक्ट नसावा) संवाद पुढे जायला हवा. जनतेच्या सेवेत कोणताही मतभेद असता कामा नेय. आशावाद जागृत ठेवावा लागेल. इथे पोहचलेला प्रत्येक व्यक्ती यासाठी जबाबदार आहे. आमच्या निर्णयामध्ये राष्ट्रीय हित सर्वोतोपरी आहे’ असंही पंतप्रधानांनी म्हटलंय.

वाचा : वाचा :

सर्वधर्म प्रार्थनेचं वाचन

पंतप्रधान मोदींच्या हस्ते संसद भवनाची पार पडली. वैदिक मंत्रोच्चारात भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. तसंच यावेळी सर्वधर्म प्रार्थनेचंही वाचन करण्यात आलं. या कार्यक्रमासाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय गृह मंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांसारखे केंद्रीय मंत्री मोठ्या संख्येनं उपस्थित राहिले. ज्येष्ठ उद्योगपती यांनीदेखील या सोहळ्याला उपस्थिती लावली.

वाचा : वाचा :

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here