मुंबईः दिल्लीतील शेतकरी आंदोलनामागे पाकिस्तान आणि चीनचा हात असल्याचं वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजप खासदार यांना उपमुख्यमंत्री यांनी खडे बोल सुनावले आहेत.

‘शेतकरी आंदोलनाबाबत दानवे यांनी केलेलं विधान पोरकट आहे. त्याला अधिक महत्त्व देण्याची गरज नाही. लोकांचं लक्ष भरकटवण्यासाठी अशी बातमी सोडायची की तीच ब्रेकिंग न्यूज झाली पाहिजे, असा खोचक टोला अजित पवार लगावला आहे. तसंच, कदाचित काही दिवसांत तुम्हाला ते मी असं बोललोचं नव्हतो, असं स्पष्टीकरणही ऐकायला मिळतील. पण शेतकऱ्यांच्या बाबतीत असं विधान करणं तथ्यहीन आहे, असं म्हणत अजित पवारांनी त्या वक्तव्याचा निषेध नोंदवला आहे.

‘दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत केंद्र सरकारने हटवादी भूमिका सोडावी, असंही ते म्हणाले आहेत. शेतकऱ्यांच्या पोटाला चिमटा बसल्यावरच तो रागाने रस्त्यावर येतो व आंदोलनाच सहभागी होतो. जर कृषीविधेयक शेतकऱ्यांच्या फायद्याचं आहे असं केंद्र सरकार बोलत असेल तर शेतकरी या कृषी विधेयकाच्या विरोधात रस्त्यावर उतरला नसता,’ अशी टीकाही त्यांनी केली आहे.

देशातील शेतकरी हा कायदा रद्द करा अशी भूमिका मांडत आहेत. यामध्ये विरोधी पक्षांना राजकारण करायचं नाही. आज थंडीच्या दिवसात करत आहेत. मंत्रिमंडळातील राज्यमंत्री बच्चू कडू हेदेखील शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन स्थळी दाखल झाले आहेत, असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here