म.टा. प्रतिनिधी, नगर: ‘मंदिरात जाताना योग्य कपडे घालावेत हे लोकांना कळत असताना सुद्धा त्या ठिकाणी एखादा बोर्ड लावला जात असेल तर मला वाटते ती गोष्ट योग्य नाही,’ असं वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार यांनी करीत एकप्रकारे शिर्डीच्या वादात उडी घेतली आहे.

शिर्डीतील साईबाबांच्या मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी भारतीय पोषाखात यावे, अशी विनंतीवजा सूचना साईबाबा संस्थानानं भाविकांना केली आहे. यावरून मात्र चांगलाच वाद पेटला आहे. भूमाता ब्रिगेडच्या यांनी तरी थेट हा बोर्ड संस्थानने काढला नाही तर आम्ही येऊ काढू, असा इशाराच दिला. त्यानुसार देसाई या येथे येत असतानाच आज सुपा टोल नाक्याजवळ पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. त्यातच आता एखाद्या मंदिरात पोषाखा संदर्भात बोर्ड लावणे योग्य नसल्याचे वक्तव्य रोहित पवार यांनी केले आहे. ते कर्जत येथे बोलत होते.

‘एखाद्या पवित्र ठिकाणी आपण जेव्हा जातो, तेव्हा महाराष्ट्रातील व देशातील संस्कृती आपणास सांगते की काय पद्धतीचे कपडे घालायचे. लोकांना कळते की मंदिरात जाताना योग्य कपडे घालावेत. हे लोकांना कळत असताना सुद्धा त्या ठिकाणी आपण बोर्ड लावत असू तर मला वाटते की ही योग्य गोष्ट नाही,’ असे मत रोहित पवारांनी मांडले आहे.

‘संविधान हे तेथे असणाऱ्या लोकांना सांगत असते कसे वागायचे. संविधानाच्या पलीकडे जाऊन आपली संस्कृती सुद्धा जी संविधानाने प्रेरित आहे, विचाराने प्रेरित आहे, अशी संस्कृती सुद्धा असे चुकीचे कपडे घालून त्या ठिकाणी जाण्यास कोणालाही सांगत नाही. अशा परिस्थितीत मुद्दाम कोणी जर बोर्ड लावत असेल तर ही योग्य गोष्ट आहे असे मला वाटत नाही,’ असेही पवार यांनी स्पष्ट केले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here