मुंबईः राज्यात आगामी विधानसभा निवडणुका महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी एकत्र लढल्यास भाजपला ५० पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत, असं विधान करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांना नेते यांनी थेट आव्हान दिलं आहे.

तीन पक्ष एकत्र येऊन लढल्यास भाजपाचे ५० आमदारसुद्धा निवडून येणार नाहीत, असं म्हणणारे जयंत पाटील यांनी लक्षात ठेवायला हवं की दगाबाजांबरोबर आघाडी करुन सत्ता मिळवणाऱ्यांनी अशा वल्गना करायच्या नसतात, अशी टीका भातखळकर यांनी केली आहे. जयंत पाटील भाजपच्या पराभवाबाबत इतके आश्वस्त आहात तर उद्या विधानसभा बरखास्त करुन राज्यात निवडणूका घ्या.. दूध का दूध पानी का पानी होऊन जाऊ देत, असा इशारा भातखळकर यांनी दिला आहे.

काय म्हणाले होते जयंत पाटील?

नुकत्याच झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची ताकद दिसून आली आहे. आगामी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सोबत लढली, तर भाजपचे ५० आमदार सुद्धा निवडून येणार नाहीत.” राजस्थान आणि हैदराबाद येथील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक मुद्दे काय होते, काँग्रेसमधील स्थानिक पातळीवरील अंतर्गत धुसफूस होती का, हे मुद्दे विचारात घ्यावे लागतील, असं ते म्हणाले आहेत.

.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here