रत्नागिरी: आधुनिक महाराष्ट्राच्या विजेच्या स्वयंपूर्ततेसाठी विद्युत प्रकल्पाचे योगदान महत्त्वाचे आहे. आगामी काळात या प्रकल्पाच्या आधुनिकीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या बाबींसाठी शासन सर्वतोपरी मदत करेल, असा विश्वास मुख्यमंत्री यांनी आज टप्पा चार विद्युतगृहाच्या पाहणी दरम्यान व्यक्त केला. ( CM Latest News Update )

वाचा:

जलविद्युत केंद्राच्या पाहणीवेळी प्रकल्पाविषयीचे सादरीकरण करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी अनेक तांत्रिक बाबींची माहिती यावेळी अभियंत्यांकडून घेतली. जलविद्युत प्रकल्पाच्या पाहणीपूर्वी उपस्थित सर्वांची करोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय तपासणीही करण्यात आली. यावेळी नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री , परिवहन व संसदीय कार्य अनिल परब, सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री (गृह) शंभूराज देसाई, आमदार भास्कर जाधव, राजन साळवी, शेखर निकम, वीज निर्मिती कंपनीचे कार्यकारी संचालक संजय खंडारे, कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, पोलीस महानिरीक्षक (कोकण परिक्षेत्र) संजय मोहिते, रत्नागिरी जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा, रत्नागिरी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग व मुख्यमंत्र्याचे खासगी सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.

वाचा:

महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प
कोयना जलविद्युत प्रकल्प हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे. कोयना नदीवर धरण बांधून पाणी आडविले आहे. या प्रकल्पाचे चार टप्पे आहेत. जास्त मागणीच्यावेळी सर्व मिळून या टप्प्यातून १९२० मेगावॅट वीज निर्मिती केली जाऊ शकते. हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ (म.रा.वि.मं./MSEB) या कंपनीच्या विद्यमाने चालविला जातो. हेळवाक जवळील देशमुखवाडी येथे या प्रकल्पाचा चौथाटप्पा तयार करण्यात आला आहे. सह्याद्री डोंगराच्या आत ३०० मीटर खोलीवर हा टप्पा आहे. या टप्प्यातून लेक टॅपिंग पद्धतीने १००० मेगावॅट वीज निर्मिती केली जाते.

पाटणच्या पर्यटन विकासासाठी आराखडा तयार करा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नंतर येथे कोयना धरणाला भेट दिली. पाहणीनंतर अधिकाऱ्यांना त्यांनी विविध सूचना केल्या. यावेळी पाटण तालुक्यात पर्यटनाला मोठा वाव असून या पर्यटन विकासातून स्थानिकांना रोजगार निर्मिती होऊ शकतो, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. सर्वांनी एकत्र बसून पाटण तालुक्याचा पर्यटन विकास आराखडा तयार करावा, अधिवेशनानंतर या पर्यटन विकास आराखड्याबाबत बैठक घेऊन येथील पर्यंटनाला शासन चालना देईल, असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज सांगितले.

वाचा:

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here