वाचा:
राज्य व देशातील शेतकऱ्यांच्या आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात आहे, असे म्हणणाऱ्या केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांची तत्काळ माफी मागावी, अशी मागणी करत प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते शिवाजीनगर भागातील जलकुंभावर चढले आहेत व तिथे त्यांनी आंदोलन सुरू केले आहे. वीस पेक्षा अधिक कार्यकर्ते जलकुंभावर असून साठ ते सत्तर कार्यकर्ते जलकुंभाच्या खाली आहेत. जोपर्यंत रावसाहेब दानवे शेतकऱ्यांची माफी मागत नाहीत. तो पर्यंत आम्ही खाली उतरणार नाही, असा पावित्रा या कार्यकर्त्यांनी घेतला आहे.
वाचा:
दरम्यान, राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दानवे यांच्या वक्तव्यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांबाबत दानवे हे अनेकदा आक्षेपार्ह विधाने करत आहेत. गेल्यावेळी आम्ही त्यांच्या घराला घेराव घातला होता. मात्र, आता त्यांनी जे विधान केले आहे ते पाहता त्यांना घरात घुसूनच चोप द्यावा लागणार आहे, असा इशाराच कडू यांनी दिला आहे. त्यानंतर कडू यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. कडू हे शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बाइकवरून कार्यकर्त्यांसह मध्य प्रदेशमार्गे उत्तर प्रदेशात पोहचले आहेत. उत्तर प्रदेशात धौलपूर-दिल्ली सीमेवर त्यांना बुधवारी रात्री रोखण्यात आले होते.
वाचा:
घरावर देणार धडक
रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांविषयी केलेल्या वक्तव्याचा जाब विचारण्यासाठी उद्या (शुक्रवारी) सकाळी अकरा वाजता दानवे यांच्या जालना येथील घरावर युवक काँग्रेस कार्यकर्ते धडक देणार आहेत, अशी घोषणा युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी केली आहे. दानवे यांनी याआधीही शेतकऱ्यांविषयी अपशब्द वापरले होते. आता पुन्हा एकदा शेतकर्यांच्या आंदोलनाला ते कुठेतरी भरकटवण्याचा प्रयत्न करीत आहेत. पाकिस्तान, चीनचा संबंध त्यांनी जाणीवपूर्वक जोडला आहे. त्याचा जाब विचारण्यासाठीच आम्ही उद्या आंदोलन करणार आहोत, असे तांबे म्हणाले.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times