जे. पी. नड्डा हे सध्या पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. त्याचवेळी त्यांच्या वाहनांच्या ताफ्यावर काही अज्ञात लोकांनी हल्ला चढवला. या हल्ल्यात काही भाजप नेते जखमी झाल्याचंही बोललं जात आहे. विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनीही या हल्ल्याचा निषेध करत ट्विटरवरुन प्रतिक्रिया दिली आहे.
भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा व कैलाश विजयवर्गीय यांच्या वाहन ताफ्यावर झालेला हल्ला हा टीमसीच्या गुंडांनी केलेलं अतिशय निंदनीय व लज्जास्पद आहे. आम्ही याचा तीव्र निषेध करतो व दोषींवर कठोर कारवाईची मागणी करतो, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी ममतादीदी हीच लोकशाही आहे का?, असा सवाल उपस्थित केला आहे.
चंद्रकांत पाटील यांचं ट्विट
तृणमूलच्या गुंडांनी भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या ताफ्यावर हल्ला केला. जे पी नड्डा हे या हल्ल्यात थोडक्यात बचावले. देशाच्या जनतेने पंतप्रधान मोदी यांना दिलेले समर्थन पाहून विरोधकांचा गोंधळ उडणं स्वाभाविक आहे. भाजप अशा भ्याड हल्ल्यांना कधीही घाबरला नाही आणि घाबरणारसुद्धा नाही, असं ट्विट चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times