वाचा:
दोनच दिवस आधी प्रताप सरनाईक यांनी ईडीच्या अटकेपासून सर्वोच्च न्यायालयाकडून संरक्षण मिळवले व गुरुवारी चौकशीसाठी ते ईडीसमोर हजर झाले. या प्रकरणात ईडीने टॉप्स समूहाचे संचालक अमित चांदोले यांना अटक केली आहे. अमित चांदोले व सरनाईक कुटुंबाचे जवळचे संबंध आहेत. तसेच एका प्रकरणात चांदोले यांच्याकडून सरनाईक यांच्याशी बेकायदेशीर आर्थिक व्यवहार झाल्याचा ईडीचा संशय आहे. त्याबाबतच आमदार सरनाईक यांची गुरुवारी चौकशी झाल्याची माहिती ईडीतील सूत्रांनी दिली आहे.
वाचा:
ईडीच्या सर्व प्रश्नांना उत्तरे दिली: सरनाईक
आजच्या चौकशीनंतर आमदार सरनाईक यांनी पत्रकारांशीही संवाद साधला. ‘देशातील काळा पैसा व आर्थिक गैरव्यवहार बाहेर काढण्यात ईडीची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळेच ईडीच्या कुठल्याही प्रकारच्या चौकशीला सामोरा जाण्यास मी तयार आहे. आजच्या चौकशीदरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांनी आर्थिक व राजकीय प्रश्न विचारले. त्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी दिली आहेत. त्यातून ईडीचे समाधान झाले की नाही, हे माहीत नाही. पण सर्व प्रकारच्या चौकशीला मी सहकार्य दिले आहे’, असे आमदार सरनाईक म्हणाले.
वाचा:
विहंग यांचीही झाली होती चौकशी
प्रताप सरनाईक यांनी ईडीच्या चौकशीला सामोरे जाण्याआधी कालच मुंबईतील सिद्धिविनायकाचे सहकुटुंब दर्शन घेतले होते. त्यावेळी बोलतानाही त्यांनी ईडीला चौकशीस सहकार्य करणार असल्याचे सांगितले होते. दिल्ली आणि महाराष्ट्राच्या लढाईत प्रताप सरनाईकचा तानाजी मालुसरे झाला आहे, असे नमूद करत या परिस्थितीला मी सक्षमपणे सामोरा जाणार आहे, असे सरनाईक यांनी सांगितले होते. सरनाईक यांच्या आधी याप्रकरणी त्यांचे पुत्र विहंग यांचीही ईडीकडून चौकशी झालेली आहे. सरनाईक यांचे घर आणि कार्यालये यांच्यावर छापा टाकला त्याच दिवशी विहंग यांना ताब्यात घेण्यात आले होते व चौकशीनंतर सोडण्यात आले होते.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times