नवी दिल्ली: आमच्या मागण्या मान्य केल्या गेल्या नाहीत, तर आम्ही देशातील रेल्वे मार्ग बंद करून टाकू असा इशारा आंदोलक शेतकऱ्यांनी केद्र सरकारला दिला आहे. रेल्वेमार्ग () बंद करण्याचे आंदोलन केव्हा करणार ती तारीख लवकरच जाहीर करू असेही शेतकऱ्यांनी म्हटले आहे. आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनेचे नेते सिंघू बॉर्डरवर पत्रकारांशी बोलत होते. आमचे आंदोलन या पुढील काळात अधिक तीव्र होणार असून राष्ट्रीय राजधानीकडे येणारे आणि जाणारे सर्व राजमार्ग आम्ही बंद करणे सुरू करू, असेही शेतकरी नेते म्हणाले. (Farmers give )

शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेश नाकारला गेल्यानंतर शेतकरी गेल्या दोन आठवड्यांपासून सिंघू बॉर्डरवर धरणे धरून बसले आहेत.

लवकरच तारखेची घोषणा करणार- बूटासिंह, शेतकरी नेते
पंजाबमध्ये टोल प्लाझा, मॉल, रिलायन्सचे पंप, भाजप नेत्यांची कार्यालयांना घेराव घालण्यात येईल असे शेतकरी नेते बूटासिंह यांनी सांगितले. या व्यतिरिक्त १४ तारखेला पंजाबच्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर धरणे दिले जाणार आहे, असे बूटासिंह म्हणाले. जर यांनी आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर आम्ही सर्व रेल्वेमार्ग बंद करू आणि यासाठी आम्ही पंतप्रधानांना १० तारखेची मुदत दिली होती, असेही बूटासिंह म्हणाले. इतकेच नाही तर रेल्वेमार्गांवर संपूर्ण भारतातील लोक जातील असेही ते पुढे म्हणाले. संयुक्त शेतकरी मंच या आंदोलनाची तारीख लवकरच जाहीर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

क्लिक करा आणि वाचा-

व्यापाऱ्यांसाठी तयार केले गेले कायदे- बलबीर सिंह

हे कायदे व्यापाऱ्यांसाठी तयार करण्यात आल्याचे केंद्र सरकारने स्वीकारले असल्याचे एका शेतकरी संघटनेचे नेते बलबीरसिंह राजेवाल यांनी सांगितले. जर कृषी हा राज्याचा विषय असेल, तर मग केंद्र सरकारला दिल्लीत कायदे बनवण्याचा अधिकार नसल्याचेही ते म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here