नवी दिल्ली: प्रत्येक गोष्ट ही किंमत चुकवल्यावरच मिळते असे नाही. येथे सिंघू बॉर्डरवर कडाक्याच्या थंडीत धरण्यावर बसलेल्या शेतकऱ्यांच्या प्रति असलेला आदरच व्यक्त करत नाही, तर ते शेतकऱ्यांना मोफक स्वेटर देखील वाटत आहेत. दररोज सकाळी ८ वाजता कुरेशी रस्त्याच्या कडेला आपला स्टॉल लावतात आणि तेथे स्थानिक ठिकाणी तयार केलेले स्वेटर नव्या केंद्रीय कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्ली-हरयाणा सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना ते मोफत वाटत आहेत. (farmer’s son distributes free sweaters at the )

शकील कुरेशी यांनी शेतकऱ्यांना आतापर्यंत ३०० जॅकेट्स आणि स्वेटर वाटप केले आहे. कुरेशी हे गरम कपडे विकण्याचे काम करतात. ते दररोज २५०० रुपयांची कमाई करतात. कुरेशी यांचे वडील उत्तर प्रदेशातील बागपत येथील शेतकरी आहेत. माझे वडील एक शेतकरी आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे आयुष्य किती कठीण असते हे मला माहीत आहे. शेतकरी आपल्या पिकाला उचित किंमत मिळावी यापेक्षा अधिक काहीच मागत नाहीत, असे कुरेश म्हणाले.

कुरेशी आपली पत्नी आणि मुलांसह उत्तर दिल्लीतील नरेला येथे राहतात. कुरेशी यांनी गरम कपड्यांच्या किंमतीविषयी काही बोलायला नकार दिला. हे चांगल्या कामासाठी माझे योगदान आहे, असे कुरेशी म्हणाले. सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी समाजातील विविध वर्गांमधून विविध प्रकारची मदत पोहोचत आहे.

क्लिक करा आणि वाचा-

काही व्यक्ती आणि स्वयंसेवी संघटना लंगर आयोजित करत आहेत, तर काही दररोज लागणाऱ्या गरजा भागवण्याचे काम करत आहेत. काहींनी तर वैद्यकीय शिबिरे देखील लावली आहेत. काही लोक तर भांडी विसळण्याचे काम करत आहेत, तर काही कचरा देखील साफ करताना दिसत आहेत.

क्लिक करा आणि वाचा-

क्लिक करा आणि वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here