कोलकातामध्ये टीएमसीच्या निदर्शनांच्या तिसर्या आणि शेवटच्या दिवशी पक्षाच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी सभेला संबोधित केलं. शेतकरी आंदोलनाचं भांडवल करण्यासाठी ते डावपेच आखत आहेत. आंदोलनामागे पाकिस्तानचा डाव असल्याचं म्हटलं जात आहे. आंदोनल रोखण्यासाठी केंद्रातील सरकार अनेक डावपेच आखले जात आहेत, अशी टीका ममतांनी केली.
पीएम केअर्स फंडच्या मुद्द्यावरून ममतांनी पुन्हा हल्ला केला. पीएम केअर फंडचं काय झालं. या फंडाचं ऑडिट का झालं नाही?, असा सवाल त्यांनी केला.
‘भाजप अध्यक्षांच्या ताफ्यावरील हल्ला नियोजित‘
भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यावर ममता बॅनर्जी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. हे सगळं नाटक आहे. माध्यमाद्वांरे भाजप नागकिरांना सभेपर्यंत आणू शकली नाही. यासाठीच हल्ल्याचा डाव रचला होता का? त्यांनी व्हिडिओ कसे काय बनवले? बीएसएफ आणि सीआरपीएफची सुरक्षा असताना तुम्हाला कोणी हातही लावू शकेल का? असं म्हणत ममतांनी प्रश्न उपस्थित केले.
देशाच्या गृहमंत्र्यांना काही काम नाही. उठसूठ पश्चिम बंगालमध्ये येतात. कधी कोण नेता तर कधी मंत्री येतात. आता चड्डा, नड्डा, फाड्डा, गड्डा आलेत. त्यांना राज्यात जनतेचं कुठलंही समर्थन नाही. यामुळे ते आपल्या कार्यकर्त्यांना नाटक करायला लावत आहे, अशी बोचरी टीका ममता बॅनर्जींनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसह भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डांवर केली.
अशाच प्रकारे हिटलर हा ‘हिटलर’ बनला. ते प्रत्येक गोष्टीचं नियोजन करत आहेत. आपले स्वतःचे व्हिडिओ रेकॉर्ड करत आहेत आणि माध्यमांकडे पाठवत आहेत. माध्यमांकडून हे व्हिडिओ दिवसभर चालवले जात आहेत. त्यांनी माध्यमांनाही विकत घेतलं आहे, असा घणाघात ममतांनी केला.
मी आरएसएसच्या हिंदूत्वाला मानत नाही. आम्ही गांधीजींच्या मारेकऱ्यांना समर्थन देणार नाही. आम्ही स्वामी विवेकानंद यांनी दिलेल्या हिंदू धर्माचे अनुसरण करतो, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times