वाचा:
केंद्र सरकारच्या विरोधात विरोधी पक्षांची आघाडी तीव्र करण्यासाठी यूपीएच्या अध्यक्ष बदलाची चर्चा गुरुवारी सुरू होती. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्या जागी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची निवड होणार असल्याचे बोलले जात होते. याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, ‘देशात शेतकरी, कामगारांवर अन्याय होत आहे. खासगीकरणाच्या माध्यमातून देश विकायला काढण्याची भूमिका भाजपने घेतली आहे. याविरोधात यूपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आजपर्यंत सर्व पक्षांना एकत्र घेऊन चांगले काम केले. काँग्रेस आणि यूपीएमधील वरिष्ठ नेत्यांच्या चर्चेतून यूपीएच्या अध्यक्षपदी दीर्घ अनुभव असलेले ज्येष्ठ नेते शरद पवार यांची निवड झाल्यास आम्हाला आनंदच होईल. शरद पवार केंद्र सरकारच्या चुका प्रभावीपणे मांडतील. शेतकरी आणि कामगारांच्या प्रश्नांवरून देशात केंद्र सरकारच्या विरोधात जनमत तयार होत आहे. याचे नेतृत्व पवारांनी केल्यास त्याचा देशाला फायदा होईल.’
वाचा:
…म्हणून पराभव पत्करावा लागला!
नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीने मिळवलेल्या यशाबद्दल सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रदेशाध्यक्ष पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना त्यांनी भाजपवर टीका करण्याची संधी सोडली नाही. ते म्हणाले, ‘भाजपने पदवीधरांचे प्रश्न सोडवण्याऐवजी वाढवले. निवडून आल्यानंतर त्यांच्या आमदारांनी पदवीधरांच्या प्रश्नांकडे पाहिलेच नाही, यामुळे त्यांना पराभव पत्करावा लागला. भाजप हा आता कामाचा पक्ष नसल्याचे मतदारांनी दाखवून दिले आहे. विधानपरिषद निवडणुकीच्या यशामुळे महाविकास आघाडी ही कृत्रिम नसून नैसर्गिक असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे. यावेळी पुणे पदवीधरचे नूतन आमदार अरुण लाड यांचाही सत्कार करण्यात आला.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times