म. टा. प्रतिनिधी, लोणावळाः मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर ( ) खंडाळा (बोरघाट) घाटातील अमृतांजन पुलाजवळ ( amrutanjan bridge ) ऑईलच्या टँकरला ( oil tanker ) सॉर्टसर्किटमुळे अचानक लागलेल्या आगीत टँकरची केबिन पूर्णपणे जळून खाक झाली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही गुरुवारी रात्री आठच्या दरम्यान घडली.
मुबंईहुन पुण्याकडे ऑईल घेऊन घेऊन जाणारा टँकर मुबंई पुणे एक्सप्रेस वेवरील बोरघाटातील अमृतांजन पुला जवळ आला असता, त्याला अचानक आग लागली. या आगीत टँकरची केबिन पूर्णपणे जळून खाक झाली असून, सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच बोरघाट दस्तुरी महामार्ग पोलिस व रस्ते विकास महामंडळाच्या आपत्कालीन देवदूत पथकाने घटनास्थळी धाव घेत तात्काळ आग्मिशन दलाच्या टँकरच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. यामुळे मोठा अनर्थ टळला. या दरम्यान एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक काहीकाळ थांबविण्यात आली होती.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times