म. टा. विशेष प्रतिनिधी,
मुंबईत करोना रुग्णांची संख्या नियंत्रणात येत असतानाच घरांच्या विक्रीतही सकारात्मक वाढ नोंदविली जात आहे. नोव्हेंबरमध्ये एकाच महिन्यात ९,३०१ झाली असून गतवर्षाच्या नोव्हेंबरच्या तुलनेत ही वाढ ६७ टक्के इतकी आहे. मुद्रांक शुल्कात कपातीसह दिवाळीनिमित्त प्रोत्साहनपर योजना आदींमुळे मुंबईत घरांच्या विक्रीत वाढ झाली आहे.

मुंबईत गेल्या नऊ वर्षांत नोव्हेंबरमधील घरांची सर्वाधिक विक्री झाली असून करोनाचा प्रादुर्भाव असतानाही घरखरेदीचा कल वाढला आहे. मुंबईत मार्चपासून करोना संसर्ग भेडसावू लागल्यानंतर अनेक व्यवसायांप्रमाणे घरांची खरेदीविक्री थांबतानाच नवीन गृहप्रकल्पांवर परिणाम झाला. लॉकडाउनचा कालावधी कमी होत गेल्यानंतर आणि गृहप्रकल्पांसाठी विविध योजना जाहीर झाल्यानंतर परिस्थितीत बदल होत गेला आहे. त्याचा परिणाम मुंबईत सप्टेंबर ते नोव्हेंबर २०२० कालावधीत दिसून आला आहे. नाईट फ्रँकच्या अहवालानुसार मुद्रांक शुल्कात कपात झाल्यानंतर शहरात २२,८२७ घरांची विक्री झाली आहे. ही वाढ २०१९च्या सरासरीच्या मानाने १.३५पट इतकी आहे. नाइट फ्रँक इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शिशीर बैजल यांनी घरांच्या विक्रीसाठी मुद्रांक शुल्कात कपात, दसरा-दिवाळी, गृहकर्जाचा कमी दर, विकासकांनी दिलेल्या योजनांमुळे विक्रीत वाढ झाल्याची प्रतिक्रिया नोंदवली आहे.

या वर्षातील गृहविक्री

नोव्हेंबर : ९,३०१
ऑक्टोबर : ७,९२९
सप्टेंबर : ५,५९७
ऑगस्ट : २,६४२
जुलै : २,६६२
जून : १,८३९
मे : २०७
एप्रिल : ०
मार्च : ३,७९८
फेब्रुवारी : ५,९२७
जानेवारी : ६,१५०

एकूण : ४६,०५२

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here