पुणे: वाट चुकून कोथरूडमध्ये घुसलेल्या रानगव्याला बुधवारी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जेरबंद केले. मात्र, त्यानंतर काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. रानगव्याला बेशुद्ध करण्याआधी विविध कारणांमुळं झालेले त्याचे हाल सध्या सर्वत्र चर्चेचा व टीकेचा विषय ठरले आहेत. पुण्यातील प्राणीप्रेमी व नागरिकांनाही या घटनेची खंत असल्याचं पाहायला मिळत आहे.

वाचा:

बुधवारी सकाळच्या सुमारास कोथरूड येथील महात्मा सोसायटी परिसरात आढळून आला. कुत्र्यांच्या हल्ल्यात तो जखमी झाला होता. सुरुवातीला शांत असलेला गवा बघ्यांची गर्दी वाढू लागल्यावर बिथरून एकाएकी रस्त्यांवरून धावू लागला. त्यानंतर पुढील दोन तास रेस्क्यू संस्थेचे कार्यकर्ते, अग्निशमन यंत्रणा, पोलिस, माध्यमांचे प्रतिनिधी, फोटोग्राफर आणि शेकडोंच्या संख्येने जमलेले हौशी नागरिक गव्याच्या मागे धावत असल्याचे दृश्य होते. गवा एखाद्या ठिकाणी दमून शांत बसला की, त्याच्याभोवती जमणारी गर्दी आणि कल्लोळामुळे तो आणखी बिथरून पुन्हा धावू लागे. त्यामुळे तो प्रचंड थकला होता. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी बेशुद्धीचे इंजेक्शन दिल्यानंतर त्याच्या तोंडाला फडके बांधले. त्यानंतर काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळं हळहळ व्यक्त होत आहे.

वाचा:

प्राणीप्रेमींबरोबरच सेलिब्रिटी आणि समाजातील मान्यवरांनी या घटनेबद्दल चिंता व दु:ख व्यक्त केलं आहे. राज्यातील सत्ताधारी शिवसेनेनं पक्षाचं मुखपत्र ‘सामना’त अग्रलेख लिहून या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. पुण्यातही या घटनेबद्दल नाराजी व्यक्त होत आहे. पुण्यातील ‘भारत फ्लॅग फाऊंडेशन’ या संस्थेनं रानगव्याची माफी मागणारे पोस्टर लावले आहेत. ‘आम्हाला माफ कर, आम्ही तुझे गुन्हेगार आहोत,’ असं त्यावर लिहिण्यात आलं आहे. ‘घटनेचं गांभीर्य ओळखुया, निसर्गात ढवळाढवळ थांबवूया… जंगले राखुया, वन्यजीव जगवुया’ असं आवाहनही या संस्थेनं केलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here