मनसेचे आज होणार अधिवेशन हे पक्षाचे रिलॉचिंग असल्याची चर्चा आहे. या अधिवेशनापूर्वी मनसे नेत्यांनी आपल्या ट्विटमधून पक्षाच्या पुढील निर्णयाबाबत सूतोवाच केले होते. त्यानंतर मनसेचा झेंडाही बदलण्यात आला आहे. त्यापूर्वी व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, प्रबोधनकार ठाकरे यांच्यासह स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा ठेवण्यात आली होती. पहिल्यांदाच सावरकर यांची प्रतिमा मनसेच्या व्यासपीठावर दिसल्यामुळे मनसे हिंदुत्ववादी भूमिका घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. सावरकर यांचे विचार हिंदुत्ववादी व वैज्ञानिकदृष्टीकोणाला पूरक असल्याचीही अनेकांनी केली आहे.
मागील काही दिवसांमध्ये सावरकरांच्या मुद्यांवरून काँग्रेस व भाजपमध्ये वादही झाले होते. या वादात शिवसेनेने सावरकरांच्या बाजूने भूमिका मांडली होती. मात्र, त्यात पूर्वीसारखा आक्रमकपणा नव्हता. महाविकास आघाडी स्थापन करताना शिवसेनेने हिंदुत्वाचा मुद्दा गुंडाळून ठेवला असल्याची टीका भाजपकडून होत आहे. त्यात सावरकर वादातही सत्तेसाठी शिवसेना शांत बसल्यााची टीका झाली. त्यामुळे शिवसेनेचे मतदार आपल्याकडे वळवण्यासाठी मनसेने पावले टाकण्यास सुरुवात केली असल्याची चर्चा आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times