यांच्या जागी शरद पवार यांना यूपीएचं अध्यक्षपद दिलं जाणार असल्याची चर्चा काल अचानक राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसनं तात्काळ यावर खुलासा करत ही चर्चा निरर्थक असल्याचं सांगितलं. देशात सध्या सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरून लक्ष विचलित करण्यासाठी काही हितसंबंधीयांकडून अशा बातम्या पेरल्या जात आहेत, असं राष्ट्रवादीनं स्पष्ट केलं आहे. त्यानंतरही चर्चा थांबलेली नाही. संजय निरुपम यांनी षडयंत्राचा आरोप करून याला आणखी वेगळं वळण दिलं आहे.
वाचा:
संजय निरुपम यांनी या संदर्भात एक ट्वीट केलं आहे. ‘शरद पवार यांच्याबद्दल सध्या सुरू असलेली चर्चा हा मुंबईपासून दिल्लीपर्यंत राहुल गांधी यांच्या विरोधात सुरू असलेल्या मोहिमेचा भाग आहे. याच मोहिमेअंतर्गत २३ जणांच्या सह्या असलेलं पत्र सोनिया गांधी यांना लिहिण्यात आलं होतं. त्यानंतर राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये सातत्याचा अभाव असल्याचा शोध लावण्यात आला होता. काँग्रेसला संपवण्याचा एका मोठा कट आहे,’ असं निरुपम यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
वाचा:
कधी काळी शिवसेनेत असलेले संजय निरुपम नंतर काँग्रेसमध्ये गेले. परप्रांतीयांच्या मुद्द्यावर शिवसेना व मनसेच्या विरोधात आक्रमक भूमिका घेणाऱ्या निरुपम यांना कालांतरानं मुंबईचं अध्यक्षपद मिळालं. मात्र, मुंबई काँग्रेसच्या गटातटाच्या राजकारणात त्यांचा टिकाव लागला नाही. सध्या ते एक प्रकारे राजकीय अडगळीत आहेत. महाराष्ट्रात शिवसेनेसोबत काँग्रेसनं आघाडी करण्यास त्यांचा तीव्र विरोध होता. या विरोधातूनच ते सध्या आपली भूमिका मांडत असतात.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times