मुंबई: नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन तीव्र होऊ लागलंय. बळीराजाच्या आंदोलनाला मनोरंजनसृष्टीतूनही मोठा पाठिंबा मिळताना दिसतोय. अनेक सिनेकलाकार सोशल मीडियावर व्यक्त होत, आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचं सांगताहेत. , हरभजन मान, , जसबीर जस्सी, रितेश देशमुख, सिनेदिग्दर्शक हन्सल मेहता आणि इतर अनेक नामवंतांनी यापूर्वीच शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला होता.

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्यानं अभिनेत्री हिनं सेलिब्रिटींवर निशाणा साधला आहे. कंगनानं एक ट्विट करत प्रियांका आणि दिलजीत यांना खडेबोल सुनावले आहेत.

कंगनानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं एक ट्विट रिट्विट केलं आहे. रिट्विट करताना कंगनानं दिलजीत आणि प्रियांका चोप्रा यांना टॅग करत कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं जे आंदोलन सुरू आहे त्याची माहिती समजावून घेण्याचा सल्ला दिला आहे.

काय म्हटलं कंगनानं?प्रिय दलजीत आणि प्रियांका.. तुम्हाला खरंच शेतकऱ्यांबद्दल कळवळा असेल किंवा तुम्हाला तुमच्या आईंचा आदर करत असाल तर हा कृषी कायदा नक्की काय आहे ? ते एकदा जाणून घ्या. की तुम्हाला आपल्या आई-बहिणींचा , शेतकऱ्यांचा वापर करून देशद्रोह्यांच्या गुड बुक्समध्ये यायचं आहे?, असं ट्विट कंगनानं केलं आहे.

काय म्हटलं होतं प्रियांका आणि दिलजीत यांनी? सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी अभिनेता दिलजीतनं शेतकऱ्यांच्यामध्ये जाऊन, एकजुटीनं लढण्याचा संदेश ट्विटरवरून शेअर केला होता. याच ट्विटला उत्तर देताना अभिनेत्री प्रियांका चोप्रानं शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लवकर लक्ष दिलं पाहिजे, असं ट्विटही केलं होतं. प्रियांकानं ट्विटमध्ये म्हटलं की, ‘आमचे शेतकरी भारताचे अन्न सैनिक आहेत. त्यांची भीती कमी करण्याची गरज आहे. त्यांच्या अपेक्षांची पूर्तता होणे आवश्यक आहे. एक मजबूत लोकशाही म्हणून आपण हे सुनिश्चित केलं पाहिजे की लवकरात लवकर हे संकट दूर होईल.’ अभिनेत्री प्रीती झिंटानं शेतकऱ्यांना ‘सैनिक’ म्हणत त्यांच्या आंदोलनाला समर्थन दिलं आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here