मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री यांनी राज्यातील २९ लाखांहून अधिक दिव्यांग व्यक्तींना एक अनोखी भेट दिली आहे. ( Update )

वाचा:

मार्फत दिव्यांग व्यक्तींना विविध सहाय्यक उपकरणे मोफत उपलब्ध करून देण्यासाठी ” हा डिजिटल प्लॅटफॉर्म ‘ओएलएक्स’ अॅपच्या धर्तीवर तयार करण्यात आला असून उद्या (शनिवारी) राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते एका कार्यक्रमात या अॅपचे लोकार्पण केले जाणार आहे, असे धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. याचबरोबर सामाजिक न्याय विभागांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे (बार्टी) चे ई-बार्टी हे मोबाईल अॅप तयार करण्यात आले असून त्याचे लोकार्पण उद्या शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त होणाऱ्या लाइव्ह सोहळ्यामध्ये होणार आहे, असेही त्यांनी नमूद केले.

दिव्यांग व्यक्तींना विविध आधुनिक उपकरणे वापरून सामान्य व्यक्तिप्रमाणे जीवन व्यथित करण्यास मोठ्या प्रमाणात मदत होते. बाजारात ब्रेल किट, श्रवण यंत्र, कृत्रिम अवयव, बॅटरीवर चालणारी व्हीलचेअर अशी दिव्यांगत्वाच्या प्रकारानुसार अनेक प्रकारची सहाय्यक उपकरणे उपलब्ध असतात, परंतु प्रत्येकाला ती विकत घेणे शक्य होत नाही. समाजात दानशूर व्यक्ती, सेवाभावी संस्था, खासगी कंपन्या, उद्योजक असे अनेक घटक दिव्यांग व्यक्तींना असे उपकरण उपलब्ध करून देण्यासाठी इच्छूक असतात, या गरजू दिव्यांग व्यक्तींची व दात्यांची सांगड घालून देण्याचे काम महाशरद या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून करणार असल्याचे मुंडे म्हणाले.

वाचा:

महाशरद प्लॅटफॉर्मवर नोंदणी करण्यासाठी www.mahasharad.in हे संकेतस्थळ उद्या सुरू होत असून येत्या मार्च अखेरपर्यंत मोबाइल अॅप्लिकेशन स्वरूपात देखील हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यात येईल अशी माहिती मुंडेंनी दिली. ‘महाशरद’चा ‘महाराष्ट्र सिस्टीम ऑफ हेल्थ रिहॅबिलिटेशन अँड असिस्टंस फॉर दिव्यांग’ असा विस्तार असून या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून २९ लाख दिव्यांग व्यक्तींपर्यंत मदत पोचवण्याचे आपले लक्ष्य असल्याचेही मुंडेंनी नमूद केले. उद्यापासूनच गरजू दिव्यांग नागरिक तसेच इच्छूक दात्यांना या पोर्टलवर नोंदणी करता येणार असून, कोणत्या प्रकारची मदत, सहाय्यक उपकरण किंवा अन्य सहाय्य आवश्यक आहे याबाबत दिव्यांगत्वाच्या प्रकारानुसार यावर सविस्तर वर्गीकरण देण्यात आले आहे.

वाचा:

यावेळी सामाजिक न्याय विभागाचे मुख्य सचिव शाम तागडे, समाज कल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे, दिव्यांग कल्याण आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, बार्टीचे महासंचालक धम्मदीप गजभिये आदी उपस्थित होते.

‘ई-बार्टी’ अँप उद्या होणार लाँच!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे (बार्टी) चे मोबाइल अॅप्लिकेशन तयार करण्यात आले असून, याचेही लोकार्पण उद्या याच कार्यक्रमात करण्यात येणार आहे. ई-बार्टी (E-Barti) हे अॅप्लिकेशन प्ले स्टोअरवर उद्यापासून उपलब्ध होणार आहे. या अॅपमध्ये एम – गव्हर्नन्स सहित, बार्टीतील सर्व योजना, ई-लायब्ररी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, अधिछात्रवृत्ती योजना आदी सर्व योजना एका क्लिकवर मोबाइलवरून हाताळता येणार आहेत. जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी, तक्रार निवारण, अभिप्राय आदी सुविधांसह विविध जातीच्या सर्वेक्षणासाठी लागणारी माहिती संकलित करण्यासाठीही हे अॅप्लिकेशन उपयुक्त ठरणार असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here