नवी दिल्ली: भारताच्या पहिल्या mRNA लशीला मानवी परीक्षणासाठी मंजुरी मिळाली आहे. हे करोनाविरोधात पडलेले यशाचे पहिले पाऊल असल्याचे मानले जात आहे. पुण्यातील कंपनी जिनोव्हा या mRNA ही लस विकसित करत आहे. या mRNA या लशीच्या मानवी परीक्षणासाठी मंजुरी देण्यात आली असल्याचे केंद्र सरकारने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

जिनोव्हा ही कंपनी अमेरिकी कंपनी एडीटी बायोटेक कॉर्पोरेशनच्या सहकार्याने या लशीची निर्मिती करत आहे. एमआरएनए लस रोगप्रतिकारक शक्तीच्या पारंपरिक मॉडेलवर काम करत नाही. एनडीटीव्हीने हे वृत्त दिले आहे.

क्लिक करा आणि वाचा ही बातमी-

mRNA लस विषाणूच्या कृत्रिम आरएनएद्वारे शरीरात असे प्रथिने निर्माण करते, जे करोना विषाणूविरोधात लढण्यात मोठी भूमिका बजावतात. mRNA लस सर्वाधिक सुरक्षित मानली जाते. कारण ही बिगर सांसर्गिक आणि बिहर एकीकृत असते. अमेरिकेची कंपनी फायझर आणि मॉडर्ना या कंपन्या ज्या लशी तयार करत आहेत, त्या देखील mRNA मॉडेलवर काम करतात. या लशी ९० टक्के प्रभावी असल्याचे या दोन्ही कंपन्याचे म्हणणे आहे.

क्लिक करा आणि वाचा ही बातमी-

क्लिक करा आणि वाचा ही बातमी-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here