सिडनी : सध्याच्या प्रत्येक खेळात व्यावसायिकपणा आला आहे आणि जिंकण्याची इर्षा वाढलेली आहे. पण काही खेळाडूंनी यामध्ये आपल्यामधील माणूसकी अजूनही सोडलेली नाही. याचे उत्तम उदाहरण आजच्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सराव सामन्यात पाहायला मिळाले. जेव्हा प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाजाच्या डोक्यावर बॉल लागला तेव्हा त्याच्याजवळ पोहोचणारा भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज हा पहिला व्यक्ती होता. धाव न घेता सिराज यावेळी गोलंदाजाच्या दिशेने धावला आणि त्याची अवस्था नेमकी कशी आहे, हे सिराजने पाहिले. त्यामुळे सध्याच्या घडीला सोशल मीडियावर सिराजवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

ही गोष्ट घडली ती भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील आजपासून सुरु झालेल्या सराव सामन्यात. दुसऱ्या सराव सामन्यात जसप्रीत बुमराने अर्धशतक झळकावत भारताची लाज राखली. या सामन्यात फलंदाजी करत असताना बुमराने एक स्ट्रेड ड्राइव्ह लगावला. त्यानंतर हा चेंडू गोलंदाजी करत असलेल्या कॅमेरुन ग्रीनच्या बोटाला लागला आणि त्यानंतर थेट डोक्याच्या उजव्या बाजूला आदळला. या दुखापतीनंतर संघाच्या डॉक्टरांनी मैदानात धाव घेतली. पण मैदानात डॉक्टर येण्यापूर्वी सिराज हा ग्रीनच्यादिशेने धावल्याचे पाहायला मिळाले.

ग्रीनची दुखापत ही गंभीर स्वरुपाची असल्याचे डॉक्टरांना समजले आणि त्यांनी ग्रीनला मैदानातून बाहेर नेले. ग्रीनवर डॉक्टरांनी उपचार केले आहेत, त्याचबरोबर त्याच्या काही चाचण्याही करण्यात आल्या आहेत. या चाचण्यांचे अहवाल आज संध्याकाळी मिळणार आहे. त्यानंतरच ग्रीन या सामन्यात खेळू शकणार की नाही, हे स्पष्ट होऊ शकते.

सराव सामन्यात डोक्यावर बॉल लागलेला ग्रीन हा दुसरा खेळाडू ठरला आहे. कारण पहिल्या सराव सामन्यात फलंदाजी करत असताना ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर विल पुकोवस्कीच्या डोक्याला चेंडू लागला होता. त्यालाही गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे पुकोवस्कीला मैदान सोडावे लागले होते. त्यानंतर आता दुसऱ्या सराव सामन्यात ग्रीनच्या डोक्याला चेंडू लागल्याची घटना आता पुढे आली आहे.

या सराव सामन्यात बुमराने भारताची लाज राखली. अखेरच्या जोडीसाठी जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी ७१ धावांची भागिदारी करत भारताची लाज राखली. बुमराह ५५ धावांवर नाबाद राहिला. त्याने ५७ चेंडूत ६ चौकार आणि दोन षटकारांसह ही खेळी केली. सिराज २२ धावांवर बाद झाला.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here